महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाऊन, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले होते. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. नंतरच्या कळात अजित पवारही राष्ट्रवादी घेऊन युतीत सहभागी झाले. युतीची महायुती झाली आणि अजित पवारही उपमुख्यमंत्री बनले. त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याच्या निर्णयासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. "उपमुख्यमंत्री होऊन जे नाव आणि प्रसिद्धी मिळाली, ती कदाचित मुख्यमंत्री होऊनही मिळाली नसती", असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तेव्हाच्या (2022) सरकार स्थापनेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस टाइम्स नाऊशी बोलताना म्हणाले, "माला जेव्हा माझ्या पक्षाने सांगितले की, आपण सर्वात मोठा पक्ष आहोत. हे नवे सरकार स्थापन होत आहे, आपल्या पक्षाचे नेते तुम्हा आहात, जर मोठ्या पक्षाचा नेता सरकारमध्ये नसेल तर, सरकारही व्यवस्थित चालणार नाही आणि पक्षही व्यवस्थित चालणार नाही आणि त्यांनी जे सांगितले मी ते ऐकले. आता जेव्हा मी मागेवळून बघतो तेव्हा मला तो निर्णय योग्य वाटतो."
तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच भाव होता की..." -फडणवीस पुढे म्हणाले, "...तेव्हा माझ्या मनात एक भाव होता, पण तो भाव हा नव्हता की, मी खाली का जात आहे? कारण मी मुख्यमंत्री झालो, कारण मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री केलं. मी मोठा तर काही माझ्या स्वतःच्या भरवशावर बनलो नाही. त्यामुळे तो भाव नव्हता. तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच भाव होता की, लोक काय म्हणतील की, हा पदासाठी किती लालची माणूस आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आज उडी मारून उपमुख्यमंत्री झाला."
...तर एवढे नेम आणि फेम मळाले नसते -"जेव्हा मी निर्णय घेतला आणि तो एक्सेप्ट केला, देशभरातील, कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये आणि जनतेमध्ये त्याचे जे कौतुक झाले, मला वाटते, मी कदाचित मुख्यमंत्री झालो असतो, तरही मला एवढे नेम आणि फेम मळाले नसते. महत्वाचे म्हणजे, अडीच वर्ष मी त्या सरकारमध्ये राहून अनेक महत्वाची कामेही करू शकलो.