पाकिस्तानविरोधातील हल्ल्याचे कॉंग्रेसकडून राजकारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:13 PM2019-04-06T19:13:17+5:302019-04-06T19:15:52+5:30
देश संकटात असताना पाकवर के लेल्या हल्ल्याचे काँग्रेसकडून पुरावे मागितले जातात. भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो.
धामणगाव रेल्वे (अमरावती) - देश संकटात असताना पाकवर के लेल्या हल्ल्याचे काँग्रेसकडून पुरावे मागितले जातात. भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो. पाकवर ज्यावेळी हल्ला करण्यात आला, त्यावेळी रॉकेटसोबत एखाद्या कॉ़ंग्रेसी नेत्याला पाठविले असते, तर पुरावे मागण्याची गरज भासली नसती, अशा खड्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ स्थानिक सेफला हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर आ. अरुण अडसड, पालकमंत्री प्रवीण पोटे, नगराध्यक्ष प्रताप अडसड, मावळते खासदार रामदास तडस, माजी खासदार अनंत गुढे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, रिपाइं (आठवले गट) चे प्रशांत मुन, सुरेखा शिंदे यांची उपस्थिती होती.
काँग्रेस विकासविरोधी असल्याचा आरोप करीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुद्रा योजनेतून बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. पीएम किसान योजनेने शेतकºयांना आर्थिक पाठबळ दिले. आतापर्यंत वैदर्भीयांवर अन्याय होत होता. मात्र आता तो अन्याय होऊ देणार नाही. मोदींच्या नेतृत्वात पुन्हा मजबूत सरकार आणण्याचे आवाहन त्यांनी केले.