शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:50 AM

Sanjay Raut Talk on Eknath Shinde: त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, कुठे त्यातील पैसे वाटले गेले याचे व्हिडीओ लवकरच बाहेर आणू असा दावा राऊत यांनी केला आहे. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता त्यांनी यावर मोठे दावे केले आहेत. नाशिक आणि कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पोलिसांना उचलताना नाकीनऊ येतील एवढ्या वजनाच्या बॅगा आणल्या होत्या, त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, कुठे त्यातील पैसे वाटले गेले याचे व्हिडीओ लवकरच बाहेर आणू असा दावा राऊत यांनी केला आहे. 

महाराष्ट्रातल्या ज्या भागात आज निवडणुका आहेत, संभाजीनगर असेल महत्त्वाचा पुणे आहे इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचे वाटप, पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसत आहे. धंगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणे धरून बसले होते. पोलिसांच्या मदतीने पैशाचे वाटप होत आहे. नरेंद्र मोदींनी जरा बघा, नुसते ज्ञान देऊ नका फडणवीस गृहमंत्री आपण जरा पाहा. नगरमध्ये खुल्या पैसे वाटताना लोकांनी पकडले आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. 

नाशिकमधला मुख्यमंत्री यांच्या आगमनाचा एक व्हिडिओ मी ट्विट केला. दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत. 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या. त्या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटत गेले, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकर देत आहोत, असे राऊत यांनी जाहीर केले.  

मुख्यमंत्र्यांच्या चार फाईल असतील. ते पण आता आचारसंहिता असताना सही करू शकत नाहीत. आमच्या गाड्या तपासल्या जात आहेत मल्लिकार्जुन खरगे यांचं हेलिकॉप्टर तपासलं जात मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरचे देखील तपासणी झाली. मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हे जे खोके आणि बॉक्स घेवून उतरत आहेत त्यांची तपासी कोण करणार, इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावर झापड आली आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. 

ईडी ही नरेंद्र मोदी यांची गँग आहे. लुटारू टोळी आहे. कितीही  पाऊस पाडू द्या उन्हाळ्यामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव हा ठरला आहे. हेलिकॉप्टरची झडती झाली असती तर ९ बॅगा उतरल्या नसत्या. किमान 12 ते 13 कोटी रुपये नाशिकमध्ये आले. छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे हे किमान 15 ते 20 सुटकेस घेऊन हॉटेल शालीमारला थांबले होते. त्यांनी पैशाचे वाटप केले होते, असा आरोप राऊत यांनी शिंदे यांच्यावर केला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेnashik-pcनाशिकmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४