मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार गेल्या ५ महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? ज्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व मोडले त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले. हिंदुत्व सोडले आणि तडजोड केली त्यांना शिकवण्याची आम्हाला आवश्यकता नाही असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही कामाख्या देवीला जाहीरपणे जाणार आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी हे सरकार स्थापन केले. आम्ही जे करतो ते उघडपणे करतोय. कुठल्याही मंदिरात जाण्यास अडथळा नाही. जे करतो ते निधड्या छातीनं करतो. माझ्यासोबत मंत्री होते. मीडिया होती त्यामुळे आम्ही जे करतो ते लपूनछपून करत नाही. उघड करतो. दिवसाढवळ्या करतो. काही लपून करतात. त्यामुळे आम्हाला शिकवू नका. आत्मविश्वास होता म्हणून ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडी सरकार कुणासाठी काम करायचं? हे सर्वसामान्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांच्या मनातील सरकार स्थापन केले. ३० जूनला ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्राची १ इंचही जागा जाऊ देणार नाही कर्नाटकच्या विषयावर मी आधीच भाष्य केले आहे. २०१२ चा विषय आहे. तेव्हा कुणाचे सरकार होते. गेल्या अडीच वर्षात सीमाप्रश्नावर काय केले? एकनाथ शिंदे सीमाप्रश्नावर आंदोलन करून ४० दिवस जेलमध्ये होतो. त्यामुळे आम्हाला सांगू नका. सीमावासियांना मिळणाऱ्या योजना मविआनं बंद केल्या. सीमावर्ती भागात मराठी माणसाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतोय. महाराष्ट्राची एक इंचही जागा कुठेही जाऊ देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
...म्हणून विरोधक राजकारण करतायेतछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. मागील ४ महिन्यापासून आमचं सरकार लोकहितासाठी काम करतंय. १०० पेक्षा जास्त निर्णय घेतलेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळे ते राजकारण करतायेत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"