शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. पनवेलमधील एमजीएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मेटे यांचे बॉडीगार्डही गंभीर जखमी झाले आहेत. मेटे यांची एसयुव्ही कार एका अज्ञात ट्रकवर धडकल्याचे चालकाने सांगितले आहे.
Vinayak Mete Death: विनायक मेटेंचे अपघाती निधन; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
विनायक मेटे हे बीडहून मुंबईला निघाले होते. यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भातन बोगद्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. सुमारे तासभर मेटे यांना कोणतीच मदत मिळाली नाही असा गंभीर आरोप त्यांच्या चालकाने केला आहे. राम ढोबळे पोलीस बॉडीगार्ड गंभीर जखमी आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला निघाले होते. बीडमध्ये आज एक कार्यक्रमही होता, तो थांबवून मेटे मुंबईला निघाले होते. रात्रीच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मी मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईला जात असल्याचे म्हटले होते.
चालकाचे आरोप काय...मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. त्यांनी मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे कदम म्हणाले. छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले.