मुख्यमंत्री शिंदे पोहोचले संघस्थानी, अजित पवारांनी तेथे येऊनही दर्शन टाळले; महायुतीत चाललेय काय?

By योगेश पांडे | Published: August 31, 2024 08:17 PM2024-08-31T20:17:23+5:302024-08-31T20:18:19+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली.

Chief Minister eknath Shinde reached RSS Headquarters nagpur, but Ajit Pawar avoided darshan bjp, Mahayuti politics | मुख्यमंत्री शिंदे पोहोचले संघस्थानी, अजित पवारांनी तेथे येऊनही दर्शन टाळले; महायुतीत चाललेय काय?

मुख्यमंत्री शिंदे पोहोचले संघस्थानी, अजित पवारांनी तेथे येऊनही दर्शन टाळले; महायुतीत चाललेय काय?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या परिसरात येऊन देखील दर्शन टाळले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वाहनांचे ताफे  स्मृतिमंदिर परिसरातच पार्क करण्यात आले होते. त्यामुळे आपल्या वाहनात बसण्यासाठी जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संघ कार्यालयात पोहोचले, तेव्हा दोघांनी हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन केले.

मात्र, काही क्षणापूर्वी अजित पवारही त्यांच्या गाडीमध्ये बसण्यासाठी रेशीमबाग येथील संघ कार्यालय परिसरात गेले होते. मात्र त्यांनी समाधीस्थळाकडे जाणे टाळले. अजित पवार यांना सत्तेत सोबत घेतल्यामुळे संघ परिवारात नाराजीच्या चर्चा आहेत. अशा स्थितीत पवारांनी दर्शन टाळल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.

Web Title: Chief Minister eknath Shinde reached RSS Headquarters nagpur, but Ajit Pawar avoided darshan bjp, Mahayuti politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.