शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 4:44 PM

आज बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम आपण करतोय. सत्तेपेक्षा नाव मोठं असतं आणि ते जपायचे असते असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

रत्नागिरी - महाराष्ट्रातले शेकडो कार्यकर्ते आपल्यासोबत येतायेत. त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होण्याचा ओढा लागला आहे. आमचे पाऊल चुकीचे असते तर एवढे लोक आले असते का? सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसैनिकाने एकनाथ शिंदेंना साथ दिली आणि राज्यात सत्तांतर घडले. बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत कार्यकर्त्यांना मोठे केले. परंतु स्वार्थासाठी, मोहापायी, खुर्चीसाठी बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे विचार बाजूला सारून जे काही घडले ते अघटित आहे. कोकणी माणसाचे बाळासाहेबांशी अतूट नाते आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाची त्यांची बांधिलकी आहे. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. 

शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत आले होते. इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल याचा विचार आम्ही केला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता जे धाडस केले ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. अनेक लोकांना चिंता होती. आपण घेतलेली भूमिका योग्य आहे हे अनेकांना वाटत होते पण त्यात यश मिळेल की नाही याबाबत शंका होती. परंतु जनतेच्या आशीर्वादाने ते यश मिळाले. आमची भूमिका चुकीची आणि स्वार्थासाठी असती तर जनतेने आमच्याकडे पाठ फिरवली असती. आज इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झाला ही आमच्या कामाची पोचपावती आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम आपण करतोय. सत्तेपेक्षा नाव मोठं असतं आणि ते जपायचे असते. आज बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतायेत. कलम ३७० हटवलं, राम मंदिर उभारलं मग बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे? जे टिंगळटवाळी करत होते त्यांना मंदिर बांधूनही दाखवले आणि उद्घाटनाची तारीखही सांगितली. राम मंदिराचा विषय आपण कधीही राजकीय केला नाही. हा श्रद्धेचा, अस्मितेचा आणि भावनेचा विषय आहे. आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होतील हे समजून बोलायला हवे. बाळासाहेब असते तर मोदींना शाबासकी दिली असती. परंतु आज त्यांच्यावर टीका करताय. राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय असं शिंदेंनी म्हटलं. 

अहंकारापोटी केंद्राकडे पैसै मागितले नाहीत

आपण आज महायुती म्हणून काम करतोय. गेली ५०-६० वर्ष जी कामे झाली नाहीत ती गेल्या साडे नऊ वर्षात होतायेत. आज केंद्राकडून आपल्याला भरघोस निधी मिळतोय. परंतु पूर्वी अहंकारापोटी केंद्र सरकारकडे पैसे मागितले जात नव्हते. तुम्ही अडीच वर्षात महाराष्ट्रात कित्येक वर्ष मागे नेले. जर आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आज आपण आणखी मागे पडलो असतो. अत्यंत विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. देशाच्या विकासात महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामा नये. राज्यात तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम उद्योगमंत्री करतायेत असं शिंदेंनी सांगितले. 

महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे

काही लोकांनी गरीबी हटावचा नारा दिला. त्यात गरिबांनाच हटवले. परंतु मागील ९ वर्षात मोदींनी गरिबांसाठी कित्येक योजना आणल्या. आपण आपलं पोट भरायचे आणि समोरच्याला काही द्यायचे नाही. देण्याची दानत लागते. आपले सरकार हे देणारे आहे. शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये दिले जातात. १ रुपयांत पीकविमा देण्याचा निर्णय महाराष्ट्राने पहिल्यांदा घेतला. महिलांना ५० टक्के एसटी सवलत देण्याचा निर्णय घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय घेतला. महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी बचत गटांना निधी दिला जातोय. योजना आणि निर्णय यापूर्वीदेखील होते. परंतु त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नव्हता. महाराष्ट्र हे आपलं कुटुंब आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते मर्यादित आपलं काम नाही. हे सरकार सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने स्थापन झाले आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना