ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 07: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती मांडली. दुष्काळाबाबत पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रानं केंद्राकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मराठवाडा-विदर्भ यासह पश्चिम महाराष्ट्रातील अपुर्ण सिंचन प्रकल्पांसलाठी महाराष्ट्रानं केंद्रकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
– दुष्काळासाठी साडे तीन हजार कोटी रुपये आजवर मिळालेत. आजवरची सर्वात मोठी मदत
– राज्य शासनाकडून दुष्काळी परिस्थिती, पावसाची आकडेवारी,धरणांची परिस्थतीवर प्रेझेंटेशनही दिलं.
– 11 हजार अतिरिक्त गावं दुष्काळामध्ये समोर आली आहे..त्यामुळे केंद्र सरकारला सप्लिमेंट्री मेमोरँडम देण्याची मागणी केली.
– येत्या 6 आठवड्यांचा केंद्र आणि राज्यसरकारचा तात्कालिन जॉइंट अँक्शन प्लॅन तयार – मॉन्सूनपूर्व कामांची तयारी
– दीर्घकालीन उपाययोजना – शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची तयारी.
– प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत महाराष्ट्राच्या 26 प्रोजेक्ट्सचा सहभाग..त्यासाठीचं लँड एक्विझिशऩसाठी सरकारची मंजुरी.
– विदर्भ आणि मराठवाड्यात 7 हजार कोटींचे प्रकल्प 3 वर्षांत पूर्ण कऱणार. शाश्वत सिंचनाची व्यवस्था.
– अवर्षण प्रवण तालुक्यांतील योजना येत्या 2-3 वर्षांत पूर्ण करण्यासाठी अडीच हजार कोटींच्या पॅकेजची मागणी.
– महाराष्ट्रातील 1 कोटी 36 लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी 58 लाख शेतकरी कर्ज घेतात.. उर्वरित शेतकरी सावकरी पाशात..अजून 20 लाख शेतकरी क्रेडीट प्लॅनमधे आले पाहिजे.
– 2012 ते 2016 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचं रिशेड्युलिंग केलं जाईल.
– मराठवाड्यात, विदर्भातले अपुरे प्रकल्प ७५०० कोटी रुपये पूर्णपणे केंद्राची मदत मागितली. पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रकल्पांसाठी २५०० कोटी रुपये मागितले आहेत.
– समुद्राचं खारं पाणी पिण्याजोगं करण्याची योजना अद्यापही विचाराधीन आहे..
– मराठवाड्यात पाऊस कमी पडला तरी तो इस्राईल पेक्षा जास्त असतो..त्यामुळे पाण्याचं नियोजन योग्य केल्यास आपण पाणी वर्षभर पुरवू शकतो.
– मराठवाड्यात 2 लाखांपेक्षा जास्त चारा छावण्या सुरू आहेत..ज्यामधे 3 लाखांपेक्षा जास्त जनावरं आहेत..लातूरसाठी पालघरहून चारा नेला होता.
Delhi: Maharashtra CM Devendra Fadnavis meets PM Narendra Modi to discuss drought situation in state pic.twitter.com/u3NbjSn5cI— ANI (@ANI_news) May 7, 2016
Apprised PM of the drought situation in the state,11000 more villages are facing drought: Devendra Fadnavis, Maha CM pic.twitter.com/Xk9yGBf3ub— ANI (@ANI_news) May 7, 2016
Centre has been helping us and has also assured more assistance if needed to deal with drought situation: Maha CM pic.twitter.com/ANEpFGUpF1— ANI (@ANI_news) May 7, 2016