शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर फटकेबाजी

By admin | Published: December 11, 2015 12:37 AM

दुष्काळासारख्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विरोधक राजकारण करत आहेत, त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही तर त्याआडून राजकारण करायचे आहे

नागपूर : दुष्काळासारख्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विरोधक राजकारण करत आहेत, त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही तर त्याआडून राजकारण करायचे आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चौफेर हल्ला चढवला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलल्यानंतर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता बोलायला उभे राहीले मात्र त्यांना थांबवत स्वत: मुख्यमंत्री उभे राहीले आणि त्यांनी विरोधकांना जोरदार टीका केली.तुम्ही अनेक वर्षे सत्तेत होतात. कोणामुळे राज्यावर ही वेळ आली याच्या राजकारणात आपल्याला जायचे नाही. मात्र आज दोन दोन वर्षे पाऊसच नाही असे अनेक जिल्ह्ये राज्यात आहेत. पाण्यासाठी जनता त्रस्त आहे. शेतकरी संकटात आहे. अशावेळी राज्यभरातले शेतकरी मोठ्या आशेने अधिवेनाकडे पहात आहेत. राज्यावर कधीही येऊ नये असे संकट कोसळले आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, आम्ही सरकारमध्ये आहोत याचा काही फायदा होईल. दोघांनी मिळून राजकारण बाजूला सारुन या विषयाकडे पाहिले पाहिजे. अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना कशा रितीने दिलासा देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. देशावर अशी संकटं आली की सगळे पक्ष आपापल्या भूमिका विसरुन एकत्र येतात असा इतिहास असताना विरोधकांना मात्र एकत्र न येता या विषयाचे राजकारण करण्यात जास्त रस आहे त्यामुळेच या वृत्तीचा मी निषेध करतो असेही मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी सत्ताधारी बाकावरुन त्यांच्या भाषणाला जोरदार समर्थन मिळत होते. (प्रतिनिधी)