ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 08 - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
कांदिवलीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांवर हल्लाबोल केला. फणडवीस म्हणजे अर्धवटराव आहेत, त्यांनाच पारदर्शक कारभार म्हणजे काय ते माहीत नाही. घसा बसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं पाणी पितात, असा टोला सुद्धा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांना लगावला.
याचबरोबर पातळी नसलेल्या माणसांशी आम्ही लढतोय, याची लाज वाटायला लागली आहे. खोटी माणसं 25 वर्षे जपली त्याच खेद वाटतंय, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे -
- फडणवीस हे 'उपरवाल्याच्या मर्जी'वाले.
- पारदर्शक कारभारात 'मुंबई नंबर - 1'
- आता पातळी सोडून आमच्यावर टीका करताय
- केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसलीयेत का?
- आता पातळी सोडून आमच्यावर टीका करताय.
- पाटना शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान.
- मुंबईचं आम्ही पाटना केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का?
- खोटी माणसं 25 वर्षे जपली त्याच खेद वाटतं.
- केंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही.
- राम मंदिर बांधलंय पण पारदर्शी आहे ते दिसत नाही.
- योग्यता नसणा-यांशी लढतोय, याची लाज वाटते.
- मुंबईत कामं करत असताना भाजप गप्प बसली, हीच मोठी मदत.
- मोदींची विश्वासार्हता संपल्याने स्टॅम्प पेपरवर घोषणा.
- घसा बसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं पाणी पितात, मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा टोला.
- आर्थिक सर्वेक्षण अहवालात पादर्शकतेच्या आलेखात मुंबईच अव्वल.
- मुंबईबद्दल बोलताना नागपूरबद्दल का बोलत नाहीत?
- कल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही.