शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

आता राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना!

By admin | Published: December 17, 2014 11:51 PM

एकूण बजेटच्या ४५ टक्के बजेट ग्रामविकास खात्याचे असते आणि त्यातला ७५ टक्के निधी केंद्राकडून राज्याच्या नोडल एजन्सीमार्फत थेट जिल्ह्याला जातो.

प्रश्न : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत नेमके काय असेल?उत्तर : या योजनेत राज्य शासनाने निधी द्यावा असे अपेक्षित आहे. शिवाय राज्याच्या विविध योजनांचा आढावा घेऊन एकात्मिक योजना तयार केली जाईल व त्यातून हे काम केले जाईल. मंत्रिमंडळासमोर हा विषय नेला जाणार आहे.प्रश्न : केंद्राचा ग्रामविकास खात्याचा निधी मिळवण्यात आघाडी सरकार यशस्वी ठरले नव्हते. आपण त्यासाठी काय करणार?उत्तर : एकूण बजेटच्या ४५ टक्के बजेट ग्रामविकास खात्याचे असते आणि त्यातला ७५ टक्के निधी केंद्राकडून राज्याच्या नोडल एजन्सीमार्फत थेट जिल्ह्याला जातो. आपण पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा देखील निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. निवडणुकांचा काळ, राजकीय कम्प्लशनपोटी द्यावा लागणारा वेळ वगळता बाकीचे दिवस मी सतत काम करीत राहणार आहे कारण माझे काऊंटडाऊन मी पदभार स्वीकारल्यापासूनच सुरू झाले आहे. प्रश्न : जुन्या सरकारच्या तंटामुक्त गाव, गाडगेबाबा स्वच्छता अभियान या योजना चालू राहतील की बंद होणार?उत्तर : कोणत्याची योजना बंद करणार नाही, मात्र सगळ्या योजनांचा आढावा घेऊ. ज्या योजना निष्फळ आहेत त्यांना पुनरुज्जीवित करू. ज्यातून काहीच निष्पन्न होत नसेल त्या बंद करू. सरकार चांगल्या योजना आणेल पण या सगळ्या योजनांचे यश-अपयश जनतेच्या प्रतिसादावर आणि मानसिकतेवर अवलंबून आहे.प्रश्न : आपला विभाग नेमके कशावर फोकस करणार आहे?उत्तर : मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जलयुक्त शिवार ही योजना जाहीर केली आहे. मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे घेण्यात येतील जेणे करून ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्याचे संकट कमी होण्यास मदत होईल. शिवाय ग्रामीण भागातील रस्ते चांगले करणे ही देखील महत्त्वाची बाब आपल्यापुढे आहे.प्रश्न : जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था बिकट आहे. त्यासाठी काय करणार?उत्तर : मी स्वत: चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. त्यावेळीपेक्षा आज त्या शाळांची अवस्था वाईट आहे. मात्र यावर त्या त्या जिल्हा परिषदांचे नियंत्रण असते. या शाळांचे सर्वेक्षण करून त्या जास्तीतजास्त ‘चाईल्ड फ्रेंडली’ कशा होतील याकडे आमचे लक्ष असेल. कागदावरील चित्र आणि वास्तव यात खूप फरक आहे हे मलाही माहिती आहे. पण आम्ही प्रयत्न करणार हे नक्की.प्रश्न : प्रत्येक खासदाराने गाव दत्तक घेण्याची योजना पंतप्रधानांनी मांडली आहे. राज्यात त्याचे रूप काय आहे?उत्तर : खूप चांगला प्रतिसाद आहे. मी स्वत: हिवरेबाजार येथे दिवसभराचा प्रशिक्षण वर्ग घेतला. पाणलोट, वनीकरणाची कामे पाहिली. आदर्श ग्राम योजनेचा कालावधी तीन वर्षाचा आहे. या काळात राज्यातली जवळपास ५० ते ६० गावे एकदम बदलेली दिसतील यासाठी आमचे काम चालू आहे.