मुंबई : मराठा आरक्षणचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, यासाठी उच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने अधिक सक्षमपणे बाजू मांडण्याचा, तसेच या आधीच्या उणिवा दूर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घेता यावा, यासाठी प्रलंबित प्रकरणाचा निपटारा गतीने करण्याची विनंती राज्य शासनातर्फे उच्च न्यायालयाला करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण मिळण्याच्या मार्गात असलेले कायदेशीर अडसर कसे दूर करता येतील, यादृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
By admin | Published: September 28, 2016 12:31 AM