शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मुख्यमंत्री, प्रधान सचिवांना नगरविकासपासून दूर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 3:41 AM

मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘फूड कोर्ट’ चालविणाऱ्या कंत्राटदाराने तेथे केलेल्या बेकायदा बांधकामाबद्दल मुंबई महानगर

मुंबई: मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘फूड कोर्ट’ चालविणाऱ्या कंत्राटदाराने तेथे केलेल्या बेकायदा बांधकामाबद्दल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बजावलेल्या नोटिशीला नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेली ‘बेकायदा’ अंतरिम स्थगिती रद्द करावी आणि या प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांना नगरविकास आणि गृह या दोन खात्यांशी संबंधित कामांपासून दूर ठेवले जावे, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.ठाणे येथील एक सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी ही याचिका केली असून नाताळाच्या सुटीनंतर ती संबंधित खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणीसाठी येथे अपेक्षित आहे. वाटेगावकर यांनी आधी याच प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. ती पुढील कारवाईसाठी मुखय सचिवांकडे पाठविण्यात आल्याचा एसएमएस त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून आला. परंतु त्यावर पुढे काहीच न झाल्याने त्यांनी आता ही याचिका केली आहे.‘बीकेसी’मधील ‘फूड कोर्ट’च्या कंत्राटदाराविरुद्धच्या नोटिशीला, कायद्यात कोणतीही तरतूद नसूनही आणि नगरविकास खात्याने तसे निदर्शनास आणून देऊनही, राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिलेल्या स्थगितीच्या संदर्भात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागास (एसीबी) दिला जावा आणि हा तपास पूर्ण होऊन त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईपर्यंत परदेशी यांना नगरविकास व गृह या दोन्ही खात्यांशी संबंधित कामापासून दूर ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना द्यावे, अशीही वाटेगावकर यांची याचिकेत विनंती आहे. कंत्राटदाराला दिलेली नोटीस व त्याला राज्यमंत्र्यांच्या पातळीवर दिली गेलेली स्थगिती या दोन्हींच्या संदर्भात ‘आरटीआय’ अर्ज करून त्यातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ही याचिका केली गेली आहे.या ‘फूड कोर्ट’चे कंत्राट मे. स्पाईस अ‍ॅण्ड ग्रेन्स ओव्हरसी प्रा. लि. या कंपनीस मिळालेले आहे. तेथे झालेल्या कथित बेकायदा बांधकामावरून ‘एमएमआरडीए’ने कंत्राटदारास नोटीस दिली होती. (विशेष प्रतिनिधी)