ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ५ : दादर पूर्वेकडील आंबेडकर भवन इमारत पाडण्याची घटना पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय लांच्छनास्पद असल्याची टीका विचारवंत आणि लेखकांनी केली आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी माफीमागण्याची मागणी करत डॉ. कुंदा प्र. नी. यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.डॉ. कुंदा यांनी सांगितले की, राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील स्मारक खरेदी केले. शिवाय इंदू मिल येथेही बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक उभे करण्याची घोषणा केली. मात्र ज्या जागेवर प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वावर होता, अशी प्रेसची इमारत जमीनदोस्त करण्याच्या कृत्याला सरकारने अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. कारणमुख्यमंत्र्यांनी १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकर भवनाच्या जमिनीवरील प्रस्तावित इमारतीचा शुभारंभ केला आणि ६० कोटींचा निधी देखील जाहीर केला.याचाच अर्थ या प्रस्तावित प्रकल्पाची संपूर्ण आखणी सरकारच्या संगनमताने झाली आहे. त्यामुळे घाईघाईने जागेचा ताबा मिळविण्यासाठी रातोरात आंबेडकर भवनाचा ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त करण्याच्या मुजोर कृत्याला सरकारचजबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, म्हणून विवध विचारवंत, लेखक आणि कार्यकर्त्यांनी एक सह्यांचे निवेदन सरकारला दिले आहे. त्यामध्ये राज्याचे माहिती आयुक्त यांची आयुक्त पदावरून हकालपट्टी करण्याची मागणीकरण्यात आलेलीी आहे. शिवाय ज्यांनी हे कृत्य केले त्यांना त्वरित अटक करून कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. बाबासाहेबांच्या सर्व वास्तू या जनतेसाठी ऐतिहासिक दस्तऐवजच आहेत, त्यामुळे त्या सर्व चळवळीचे आधारकेंद्रआहेत. त्यात कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याला येण्याजाण्यास मज्जाव केला जात नसे. त्यामुळे त्यांच्या कार्यभूमीवर पुढे काय व्हावे? आणि त्यांच्या कार्याच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे? हे पारदर्शकपद्धतीने जनसुनावणी घेऊन ठरवावे. ते सांगण्याचा अधिकार जनतेचाच आहे.........................ऐतिहासिक दस्तऐवज पुनर्स्थापित कराआंबेडकर भवन जमीनदोस्त केल्यानंतर मातीत गाडले गेलेले सगळे ऐतिहासिकदस्तऐवज बाहेर काढून काळजीपूर्वक पुनर्स्थापित करण्याची मागणीही निवेदनातकरण्यात आली आहे. शिवाय ऐतिहासिक वस्तू चोरून नेणाऱ्यांवर दरोडेखोरीचागुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले आहे........................ज्येष्ठ लेखक, विचारवंतांचा निवेदनास पाठिंबाउर्मिला पवार, अर्जुन डांगळे, जयंत पवार, जतीन देसाई, संजय पवार,डॉ.कुंदा प्र. नी, प्रा. आशालता कांबळे, डॉ. श्रीधर पवार, आनंद पटवर्धन,रमेश पिंपळे, स्वातीजा मनोरमा, डॉ. चयनीका शहा, संध्या गोखले, सुरेशसावंत, सुनील कर्णिक, प्रा. कुमुद पावडे, प्रा. अर्चना हातेकर, प्रा.संगीता ठोसर, उषा आंभोरे, कविता मोरवणकर, प्रा. रेखा मेश्राम, राजू जाधव,डॉ. भारत पाटणकर, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. सुबोध मोरे, अनिल सावंत, कॉ.राजन बावडेकर या दिग्गज आणि ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि आंबेडकरी चळवळीतीलनेते व कार्यकर्त्यांनी निवेदनाला पाठिंबा दिला आहे.
आंबेडकर भवन प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
By admin | Published: July 05, 2016 9:26 PM