मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घेऊ नये, अजित पवार यांचा CM शिंदेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 09:11 AM2022-08-21T09:11:11+5:302022-08-21T09:11:24+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली.

Chief Minister should not take emotional decisions Ajit Pawar advises CM Shinde | मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घेऊ नये, अजित पवार यांचा CM शिंदेंना सल्ला

मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घेऊ नये, अजित पवार यांचा CM शिंदेंना सल्ला

googlenewsNext

नागपूर :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र, दहीहंडीत सहभागी गोविंदांचे रेकॉर्ड कसे ठेवणार, त्यांची शैक्षणिक पात्रता याबद्दल माहिती कशी ठेवणार, त्याची माहिती कोण देणार, हे स्पष्ट नाही.  निर्णय घेताना क्रीडा विभागाला विश्वासात घेतले नाही, अशी टीका करीत मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचे नसतात, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

‘गोविंदा’ अगोदर त्यांना नोकरी द्या : भुजबळ
नाशिक : गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्यास आपला विरोध नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल केलेले ऑलिम्पियन कविता राऊत, दत्तू भोकनळ, अंजना ठमके यांच्यासह अनेक खेळाडू अद्यापही शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याने देशाचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूंना नोकरी देण्याचा निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Chief Minister should not take emotional decisions Ajit Pawar advises CM Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.