शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तीन चाकी रिक्षाच परवडते; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 12:10 PM

महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे.

नागपूर: नागपूरात आज (गुरुवारी) हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. राज्यापालांच्या अभिभाषणात देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलेले सरकार तीन चाकी रिक्षा सारखे असल्याचे सांगत महाविकासआघाला टोला लगावला होता. तसेच प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा होणं धोकादायक असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आली नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपाने सभागृहात आज देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना  25,000 रुपये हेक्टरी मदत जाहिर करण्याची मागणी केली होती. सभागृहात काही वेळ चाललेल्या आरोप- प्रत्यारोपनंतर भाजपाने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना बुधवारी देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्वज्ञान उभं करण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका त्यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरुन फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला होता. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळावा. आश्वासनं स्वत:च्या भरवशावर द्यायची असतात आणि स्वत:च्याच भरवशावर पाळायची असतात, असा टोला फडणवीसांनी लगावला होता. ठाकरे सरकारचा उल्लेख 'स्थगिती सरकार' असा करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस