शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

Uddhav Thackeray : अवघे राज्य चिंतेत! नव्या वर्षात कोरोनाचे सावट हाेणार गडद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ दिवसांत घेणार निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 6:50 AM

Uddhav Thackeray : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात नव्या वर्षांत पुन्हा निर्बंध लावावे लागतील, अशा सूचना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिल्या. निर्बंधांबाबत दोन दिवसांत निर्णयाची शक्यता आहे.

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि बाधित रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य मंत्री, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत घेतलेल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात नव्या वर्षांत पुन्हा निर्बंध लावावे लागतील, अशा सूचना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिल्या. निर्बंधांबाबत दोन दिवसांत निर्णयाची शक्यता आहे.

कोरोना स्थितीच्या आढाव्याबाबत गुरुवारी दोन तास बैठक झाली. गर्दी टाळण्यावर निर्बंधांमध्ये भर दिला जाणार आहे. शक्यतो अर्थचक्र थांबणार नाही, हे बघणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणावी किंवा मर्यादित उपस्थितीत परवानगी द्यावी, अशा सूचना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिल्या. रेमडेसिविरप्रमाणे उपचार करताना दुष्परिणाम होऊ नये, यासाठी अभ्यास केला जाईल, असेही टोपे म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले...आपण निर्बंध आणणार असू तर त्याचे समर्थन कसे करणार? निर्बंध लादताना काय कारणे देणार आहोत. त्याबाबत नागरिकांना व्यवस्थित माहिती द्यावी लागेल.

 बैठकीत काय झाली चर्चा?- शाळा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय नाही- शाळांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू होतील- नवीन वर्षाचे स्वागत करताना गर्दी टाळण्यावर भर देणार.  सामूहिक संसर्गाबाबत अजून निष्कर्ष काढलेला नाही- ‘वर्क फ्रॉम होम’बाबत चर्चा झाली, त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार- १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करणार- कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर

७ दिवसांत १० हजारांहून अधिक रुग्ण             मुंबई                ठाणेतारीख     चाचण्या     बाधित     चाचण्या     बाधित ३० डिसेंबर     ४६,३३७    ३६७१    उपलब्ध झाले नाही२९ डिसेंबर     ५१,८४३     २५१०    १६,४६२    ८६४२८ डिसेंबर     ३२,३६९    १३७७    १४,५१०    ५८२२७ डिसेंबर     ४३,३८३     ८०९    १९,९११    ३११२६ डिसेंबर     ३४,८१९     ९२२    १६,९४२    २४९२५ डिसेंबर     ४२,४२७     ७५७    १४,६८८    २३५२४ डिसेंबर     ४०,४७२     ६८३    २०,९८०    २४६

निर्बंधाबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. गर्दी नको, या मुद्द्यावर सर्वांचे एकमत आहे. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.    - राजेश टोपे, आरोग्य मंत्री

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस