मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग पुणे शहरात झाला आहे. यामुळे आता पुण्यामध्ये अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. या परिस्थितीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तेथील लॉकडाऊन घाईघाईने उठविण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
कोरोनाचे संक्रमणाचा धोका पुण्यात वाढत आहे. तिथे अधिक लक्ष द्यायला हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आधीपासूनचे म्हणणे होते. तिथे घाईघाईने लॉकडाऊन उठविण्यात आला, त्यालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोध होता, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.
पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर टीकेटी झोड उठली आहे. त्यांना अॅम्बुलन्स न मिळाल्याने प्राण गमवावे लागले होते. यावर राऊत यांना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आले. यावर राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली इथे उभारण्यात आलेली कोविड सेंटर व्यवस्थित सुरू आहेत. काही त्रुटी असू शकतात. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध होण्याआधीच ते सुरू करण्यात आलं होतं, असं आता समोर आलंय. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दोष देण्याची पद्धत चुकीची आहे.
पांडूरंग रायकरांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात आली, असे मला समजले आहे. दुर्दैवानं त्यांना अँब्युलन्स मिळायला उशीर झाला. पुण्यासारख्या शहरात हे होणं बरोबर नाहीय. सरकारने यापुढे काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
पुण्यात आता मुंबई पॅटर्नपुण्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबई पॅटर्न राबविला जात आहे. काही अडचणी असतील त्या दूर करून जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील याची जबाबदारी सर्वांनी घ्यायची आहे. राज्य सरकार किंवा महापालिकाच नाही, तर विरोधकांचीही जबाबदारी आहे, जनता आणि शहर हे सर्वांचेच आहे, असे राऊत म्हणाले.
मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला