लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल आता एकमेकांना भेटतात. मात्र, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, अशी टिप्पणी करत लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले, २०१९ मध्येही आमच्या विरोधात एकत्र येण्याचे प्रयत्न झाले. मात्र, आम्हाला जनसमर्थन आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गावर सुसाट वाहन चालविले. थेट नवी मुंबईपर्यंत आणि तेथून परतीचा प्रवास करताना फडणवीस यांनी ड्राइव्ह केले. त्यांच्या बाजूच्या सीटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबर महिन्यात खुला होईल. हा केवळ पूल नाही. मुंबईमधून २० मिनिटांत नवी मुंबईत जाता येणार आहे. नवी मुंबई विमानतळ गाठता येणार आहे. ३० वर्षे या पुलाची चर्चा होती. मोदी सरकारमुळे हे काम शक्य झाले आहे, असे ते म्हणाले.