मुंबई : मुंख्यमंत्र्याच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला भरधाव इनोव्हाची धडक बसून अपघात झाला. या भीषण अपघात पोलिसांची स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडीचे नुकसान झाले. यामध्ये दोन पोलिसांसह इनोव्हामध्ये बसलेल्या तीन तरुणी जखमी झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एस्कॉर्ट ताफ्यातील स्कॉर्पिओ (एमएच-०१-एएल-५९८) या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी गुरुवारी रात्री १२ च्यादरम्यान चंद्रकांत तोरवे व विठ्ठल सावंत हे पोलीस नागपाडा पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात पट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल भरुन ते परत राजभवनकडे येत होते. दरम्यान पोलिसांची स्कॉर्पिओ वाळकेश्वर रोड राजभवनच्या लोअर गेटजवळ आली असता समोरून विरोधी दिशेने आलेल्या इनोव्हा कारने (एमएच- ०२- बीडी- ८९०४) त्यांना धडक दिली. या धडकेत पोलिसांची स्कॉर्पिओ रस्त्याच्या फुटपाथवर जाऊन आदळली. या अपघातात पोलीस वाहनात असलेले चंद्रकांत तोरवे व विठ्ठल सावंत हे पोलीस जखमी झाल असून त्यांना बॉम्बे हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर इनोव्हामध्ये असलेली फायजा मोमीन (२१) व इनशा मोमीन (१६) व जुही शहा (२२) वर्षीय दोन मुली अशा एकूण तिघीजणी गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जवळच्याच एलिझाबेथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताप्रकरणी शुक्रवारी पहाटेच्या मलबार हिल पोलिसांनी भरधाव वाहन चालवल्याप्रकरणी फायजा मोमीन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती मलबार हील पोलिसांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात
By admin | Published: July 30, 2016 1:43 AM