ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ४ - राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी आज अनेक घोषणा केल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी सरकाने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २९ मंत्र्यांनी आज (शुक्रवारी) लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील २९ तालुक्यांची दुष्काळ पाहणी केली. ‘एक दिवस, एक मंत्री, एक तालुका’ अशा पद्धतीने पाहणीचे नियोजन करण्यात आले होते.
दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर करण्यात आलेल्या घोषणा -
- लातूरची पाणीसमस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तीन पर्यायांबाबत तत्काळ व्यवहार्यता अहवाल सादर करणार
- दुष्काळी भागात ज्या शेतकऱ्यांचे वीजपंप बंद होते, त्यांना बिल भरावे लागणार नाही
- १ हजार ७९९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, गरज पडली तर आणखी सुरु करणार, पाणीपुरवठ्यासाठी लातूर मनपाला १५ कोटी
- दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीच्या योजनेचा आणखी विस्तार करणार: मुख्यमंत्री
- चारा छावणीसाठी आणखी ५० कोटी रुपये देणार
- टंचाईच्या निकषात बदल करणार
- लातूरसाठी भंडारवाडीतून पाण्यासाठी ६४ कोटी मंजूर
- उद्गीर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटींचा प्रस्ताव मंजूर
- २०१५च्या कर्जाचे पुनर्गठन करणार, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध होऊ शकेल
- विंधन विहिरी दुरूस्ती कामासाठी आर्थिक मर्यादा १० लाखांवरून २० लाखांवर, बुडित क्षेत्रात चर घेण्यासाठी २० लाखांची मर्यादा ५० लाखांवर
- मागेल त्याला शेततळे योजनेसाठी भक्कम आर्थिक तरतूद, पूर्ण क्षमतेने योजना राबविणार
- भंडारवाडी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी ३७ कोटी, मातोळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी २५ कोटी मंजूर
- दुष्काळी भागात ज्या शेतकऱ्यांचे वीजपंप बंद होते, त्यांना बिल भरावे लागणार नाही
- दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीच्या योजनेचा आणखी विस्तार करणार
- मराठवाड्यातील वीज सुविधा भक्कम करण्यासाठी ५६१ कोटी
- १७९९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, गरज पडली तर आणखी सुरु करणार, पाणीपुरवठ्यासाठी लातूर मनपाला १५ कोटी
- २०१५-१६च्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय, त्यामुळे खरीपासाठी कर्ज उपलब्ध होणार