ऑनलाइन लोकमतपनवेल, दि. 13- पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासाठी नगरविकास विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे. शुक्रवारपर्यंत महापालिकेची अधिसूचनाही विधी आणि न्याय खात्यामार्फत काढण्यात असल्याची माहिती देण्यात आली. पनवेल महापालिकेत पनवेलसह लगतच्या 68 गावांचा समावेश करण्यात आला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी ही महापालिका स्थापण्यात हिरवा कंदील दाखविला होता. आता मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सही केल्यानं पनवेल महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महापालिका राज्यातील 27 वी महापालिका ठरणार आहे. तर मुंबई महानगर प्रदेशामधील ही नववी महापालिका असणार आहे. या नव्या महापालिकेत एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि एमआयडीसी ही चार नियोजन प्राधिकरणे आहेत.
पनवेल महानगरपालिकेला मुख्यमंत्र्यांची मान्यता
By admin | Published: May 13, 2016 6:17 PM