शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मुख्यमंत्री करणार अवयवदानाविषयी जनजागृती

By admin | Published: August 28, 2016 3:25 AM

अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभरात तीन दिवसीय ‘अवयवदान जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० आॅगस्ट रोजी मुंबई नरिमन पॉइंट येथून

मुंबई : अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभरात तीन दिवसीय ‘अवयवदान जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० आॅगस्ट रोजी मुंबई नरिमन पॉइंट येथून राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वॉकेथॉन’ने या अभियानाची सुरुवात होणार आहे. येत्या ३०, ३१ आॅगस्ट, १ सप्टेंबर या तीन दिवसांत ‘महाअवयवदान जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० आॅगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता वॉकेथॉनची सुरुवात राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. या ‘वॉकेथॉन’मध्ये शासकीय, निमशासकीय रुग्णालयांचे सर्व वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी संघटना आणि नागरिक सहभागी होणार आहेत. याचबरोबरीने पुढील तीन दिवस राज्यस्तरावर, जिल्हा आणि तालुका पातळीवर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मुंबईमध्ये होणारे विविध कार्यक्रम जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या अधिपत्याखाली होणार आहेत.या अवयवदान चळवळीत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सर्व स्तरांत अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)कुठे करू शकता नावनोंदणी?अनेकांना अवयवदान करण्याची इच्छा असते. अवयवदान करण्यासाठी अवयवदानाची नोंदणी करणे आवश्यक आहे. आता एका क्लिकवर अवयवदानाची नावनोंदणी करणे शक्य आहे. अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती आणि वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत अवयवदानासाठी आॅनलाइन नावनोंदणी करण्यासाठी ६६६.ेिी१.ङ्म१ॅ या संकेतस्थळाला भेट देता येईल.ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाइकांनी घ्यावा पुढाकारमानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४मध्ये अंमलात आणल्यानंतर ११ हजार ३६४ मूत्रपिंड, ४६८ यकृत, १९ हृदय आणि ३ फुप्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी ४५० ते ५०० इतकी नेत्र बुब्बुळे प्रत्यारोपित करून दृष्टिहीनांना दृष्टी देण्यात आली आहे.मूत्रपिंडाचे आजार वाढत असून, मूत्रपिंडाची आवश्यकता अधिक आहे. राज्यात दर महिन्याला १ लाख २० हजार इतके डायलेसिस केले जाते. अवयवदानाचा टक्का वाढवण्यासाठी ‘बे्रनडेड’ व्यक्तींचे अवयव गरजू रुग्णांना उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाइकांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याची माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.