ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ - मुंबईपाठोपाठच आता पुण्यातही मेट्रो रेल्वे धावणार असून शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यामधल्या प्रचंड वाढलेल्या रहदारीवर दीर्घकालीन तोडगा म्हणून मेट्रो रेल्वेची मागणी ब-याच काळापासून होत होती. आज शनिवारी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली असून पुण्यातल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. तसेच दुस-या टप्प्याच्या मेट्रोच्या शक्यतेचा विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. या समितीने एका महनियात अहवाल सादर करायचा असून त्याच्यानंतरच दुस-या टप्प्याच्या मेट्रोचा विचार करण्यात येईल आणि त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
निगडी ते स्वारगेट असा पुणे मेट्रोचा पहिला टप्पा असून त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.