मुंबई : नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सकारात्मक संकेतावर ‘मुख्यमंत्र्यांचे संकेत खरेच ठरतात’, अशा शब्दात राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र मी महाराष्ट्रात सर्व पदे भूषविली आहेत. महत्वाकांक्षा ब-याच असल्या तरी मी संतुष्ट आणि समाधानी आहे, असे राणे म्हणाले.ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर, केसरकर यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. केसरकरांचे फक्त सहा सरपंच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनीच राजीनामा द्यावा, असे राणे म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३२सरपंच आमचे आहेत. या निकालातून सर्वच पक्षांना सिंधुदुर्ग म्हणजे राणेहा संदेश पोहचला आहे. मी काम करतो, विकास केला म्हणून जनता आजही माझ्यासोबत असल्याचा दावाही राणे यांनी केला. मुंबईतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेतगेले आहेत. या फोडाफोडीवरूनराज आणि उद्धव ठाकरे यांच्यात शब्दयुद्ध पेटले आहे. याबाबत विचारले असता या दोघांमधील वाद हा घरगुती मामला आहे. मी त्यावर कोणतंही भाष्य करणार नाही. परंतु, राजकारणात नातं आणि नैतिकता आता शिल्लक राहिलेली नाही, असेही राणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे संकेत खरेच ठरतात - नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 4:32 AM