मुंबई : महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी प्रकल्पांना सामाईक अर्जावर आणि एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मंजुरी देतानाच पारदर्शकपणे या प्रकल्पांची निवड केली जाईल, असे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले. बार्सिलोना; स्पेन येथे आयोजित स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेसमध्ये ते बोलत होते. परिषदेत मेक इन इंडिया दालनाचे उद्घाटन त्यांनी केले. त्यांच्या शिष्टमंडळाने बेल्जिअमच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत चर्चा केली. (विशेष प्रतिनिधी)
बार्सिलोनाच्या परिषदेत मुख्य सचिव सहभागी
By admin | Published: November 17, 2016 4:46 AM