मुंबई : वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांचे नाव मुख्य सचिव म्हणून निश्चित मानले जात आहे. विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक हे ३० एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत.मुख्य सचिव पदासाठी डी. के. जैन आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या नावाची चर्चा आहे. सेवाज्येष्ठतेचा निकष हा गाडगीळ यांच्या बाजूने आहे. तथापि, सेवाज्येष्ठता डावलून मुख्य सचिवपद दिल्याची आजवरची काही उदाहरणे आहेत. युती शासन आणि आघाडी सरकारमध्येही सेवाज्येष्ठता डावलण्यात आली होती. सेवाज्येष्ठता हा एकमेव निकष यापूर्वीदेखील कधीही नव्हता. आयएएसमधील रँकिंग हाही एक निकष असतो.मेधा गाडगीळ आणि डी.के.जैन हे दोघेही १९८३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. २९ आॅगस्ट १९८३ रोजी ते आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाले. हे लक्षात घेता दोघे एकाच पातळीवर आहेत. मात्र, गाडगीळ यांची जन्मतारीख ही ४ आॅगस्ट १९५९ आहे. त्या ३१ आॅगस्ट २०१९ ला सेवानिवृत्त होतील.जैन यांची जन्मतारीख २५ जानेवारी १९५९ आहे आणि ते ३१ जानेवारी २०१९ ला सेवानिवृत्त होतील. कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून जैन यांची ओळख आहे. डी. के. जैन मुख्य सचिव झाल्यानंतरवित्त विभागाच्या अतिरिक्तमुख्य सचिव पदाची जबाबदारी यु.पी.एस. मदान यांच्याकडे दिली जाईल, असे सुत्रांनी सांगितले. मदान हे सध्या एमएमआरडीएचे आयुक्त आहे.>मलिक मुख्य माहिती आयुक्तनिवृत्तीनंतर लगेच सुमित मलिक यांची राज्याच्या मुख्यआयुक्तपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रत्नाकर गायकवाड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, १ जून २०१७ पासून मुख्य आयुक्तांचे पद रिक्त आहे. मुंबई विभागाचे आयुक्त अजितकुमार जैन यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. मुख्य आयुक्त कार्यालयात ६ हजार २०० प्रकरणे प्रलंबित आहेत.>समिती नेमा : नीला सत्यनारायणकोणत्या अधिकाऱ्याची जनतेशी नाळ अधिक जुळलेली आहे. महाराष्ट्राचे आर्थिक, सामाजिक प्रश्न याबाबत कोण अधिक संवेदनशील आहे, हेही मुख्य सचिव नेमताना बघितले पाहिजे.मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत असलेल्या अधिकाºयांच्या मुलाखती मुख्यमंत्र्यांसह तीन ज्येष्ठ मंत्र्यांच्या समितीने घेतल्या पाहिजेत,असे मत निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले. पूर्वीसारखी संवदेनशीलता आजच्या आयएएस अधिकाºयांमध्ये दिसत नाही, अधिकारी परग्रहावरून आल्यासारखे वागतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मुख्य सचिवपदी डी. के. जैन?
By यदू जोशी | Published: April 12, 2018 6:38 AM