शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गडचिरोलीत हरक्विलीनग्रस्त जन्मले बाळ

By admin | Published: June 15, 2016 12:03 AM

अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या हरक्विलीन या आजाराने ग्रस्त बाळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात ३१ मे रोजी जन्माला आले.

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. १५ - अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या हरक्विलीन या आजाराने ग्रस्त बाळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात ३१ मे रोजी जन्माला आले. पाच दिवस जिवंत राहिल्यानंतर सदर बाळाचा ४ जून रोजी मृत्यू झाला. मात्र नागपूर येथे अशाच आजाराच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर गडचिरोली येथील या बाळाच्या जन्माची घटना १४ जून रोजी उघडकीस आली.निर्मला तिरुपती लेकूर रा. देवलमरी असे बाळाच्या आईचे नाव आहे. निर्मला ही प्रसूतीसाठी देवलमरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती झाली. मात्र तिला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे रेफर करण्यात आले. तिची प्रसूती अत्यंत गुंतागुंतीची वाटल्याने तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. ३१ मे रोजी निर्मलाला हरक्विलीन रोगग्रस्त मुलगी जन्माला आली. तिची त्वचा कडक व फाटली होती. काही ठिकाणांमधून रक्त बाहेर पडत होते. बोटे अत्यंत लहान होती. चेहरा दिसायला अत्यंत विद्रूप होता. त्वचेतून रक्त बाहेर निघत असल्याने संपूर्ण बाळ लाल रंगाचे दिसत होते. गडचिरोली रुग्णालयातील प्रसूतीतज्ज्ञांनी या बाळाला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला दिला. मात्र निर्मला लेकूर यांची परिस्थिती हलाखीची असल्याने या बाळाला नागपूर येथे हलविण्यास नकार दिला. गडचिरोली रुग्णालयातून सुट्टी करून त्याला देवलमरी येथे स्वत:च्या गावी घेऊन गेले. गावी नेल्यानंतरही सदर बाळ पाच दिवस जिवंत होते. ४ जून रोजी त्या बाळाचा मृत्यू झाला, अशी माहिती अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.