अमित सोमवंशी : सोलापूर लोकमतसोलापूर दि १९ : सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुरुष अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. कुत्र्यांने बी ब्लॉक जवळ अर्भक आणून त्याचे लचके तोडले. हे रूग्णालयातील नसल्याचे स्पष्ट झाले; पण सुरक्षारक्षकांचा राबता असलेल्या या ठिकाणी अशी घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.घटनास्थळी पोलीस उपआयुक्त अपर्णा गिते, सहायक पोलीस निरक्षक सय्यद यांनी भेट देऊन तेथील ‘सीसीटीव्ही’ कॅमेºयातील चित्रणाची पाहणी केली. त्यावेळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात कुत्र्याने पुरुष जातीचे अर्भक बाहेरुन कुठे आणून रुग्णालयातील बी ब्लॉकच्या बाजूला त्या अर्भकाचे लचके तोडल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षा रक्षकानेही ही घटना पाहिली. रुग्णालयातील प्रसूत झालेल्या महिलांकडे चौकशी करण्यात आली. तसेच रुग्णालयात प्रसूत झालेली महिला कोणीही निघून गेली नसल्याचेही स्पष्ट झाले. याप्रकरणाचा तपास सदर बझार पोलीस ठाण्यामार्फत होत आहे.---------------------शवविच्छेदन करणारडॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांना यासंदर्भात विचारले असता, त्यांनी हे अर्भक सिव्हीलमधील नसल्याचे सांगितले. या अर्भकाचे शवविच्छेदन केले जाईल, असेही ते म्हणाले.
कु त्र्याने तोडले अर्भकाचे लचके ! सोलापूर शासकीय रूग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:48 PM
सोलापूर दि १९ : सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुरुष अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. कुत्र्यांने बी ब्लॉक जवळ अर्भक आणून त्याचे लचके तोडले. हे रूग्णालयातील नसल्याचे स्पष्ट झाले; पण सुरक्षारक्षकांचा राबता असलेल्या या ठिकाणी अशी घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ठळक मुद्देयाप्रकरणाचा तपास सदर बझार पोलीस ठाण्यामार्फत होत आहे.शवविच्छेदन करणार - डॉ. सुनील घाटे रुग्णालयातील प्रसूत झालेल्या महिलांकडे चौकशी