शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
5
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
10
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
15
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
16
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
17
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
18
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
19
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
20
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बाल विज्ञान परिषदेकडून घडवले जाताहेत बाल वैज्ञानिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 5:22 AM

राष्ट्रीय स्तरावर झेप : सुवर्णपदके मिळविणाऱ्या मुंबईतील शाळांमधील आठ बाल वैज्ञानिकांचा सन्मान

मुंबई : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत या वर्षी मुंबईतील आठ विज्ञान प्रकल्पांची निवड झाली आहे. १० ते १७ वर्षे वयोगटातील या आठ विद्यार्थ्यांमधील विज्ञान संशोधन वृत्तीचा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी शिक्षण विभागाने सत्कार केला.मागील वीस वर्षांपासून मुंबईत शालेय शिक्षण विभाग आणि नवनिर्माण विज्ञान प्रबोधन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. अनेक नामांकित शाळा यात दरवर्षी सहभागी होत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके मिळवत असल्याची माहिती मुंबई बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष बी. बी. जाधव यांनी दिली.

या स्पर्धेच्या तयारीसाठी मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक अशा १८ प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. यात प्रकल्पाचा मुख्य विषय आणि उपविषयावर तसेच संशोधन प्रकल्प पद्धतीवर मार्गदर्शन केले जाते. यातील दर्जेदार प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली जाते. २०१८-१९ या वर्षात राज्यस्तरीय परिषदेसाठी राज्यातून निवडलेल्या प्रकल्पांमधून ३० प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. यापैकी आठ प्रकल्प मुंबईतील आहेत. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे तर मुंबईतील जिल्हास्तरीय स्पर्धा नवनिर्माण विज्ञान प्रबोधन संस्थेमार्फत आयोजित करण्यात येतात. मुंबईतील आठ प्रकल्पांची निवड कौतुकास्पद असून बाल वैज्ञानिक घडविण्यासाठी बाल विज्ञान परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.स्पर्धेत क्लोरोफिलिसिटी हीच शाश्वत ऊर्जा, टेट्रा पॅक आणि प्लॅस्टिक बॉटल्स यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंचा तुलनात्मक अभ्यास, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, फायलोरेमेडिशन प्रकल्प अशा विविध विषयांवरील मुंबईतील ८ प्रकल्प सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.सुवर्णपदकप्राप्त आठ प्रकल्पांसाठी विद्यार्थ्यांना मिळाले शिक्षकांचे मार्गदर्शनच्‘क्लोरोफिलिसिटी हीच शाश्वत ऊर्जा’ यावर आधारित प्रकल्प सेंट जॉन्स हायस्कूल, बोरीवली पश्चिम येथील विवेककुमार यादव या विद्यार्थ्याने शिक्षिका मनाली राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. तर ‘टेट्रा पॅक आणि प्लॅस्टिक बॉटल्स यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंचा तुलनात्मक अभ्यास’ हा प्रकल्प अरविंद गंडभीर, जोगेश्वरी या शाळेतील गुंजन सागवेकर या विद्यार्थिनीचा असून शिक्षिका विद्या रानडे यांनी तिला मार्गदर्शन केले.

च्मुंबईतील डॉन बॉस्को, जॉफ्री नाडर या विद्यार्थ्याने ‘कचरा व्यवस्थापन’ प्रकल्प सादर केला. त्याला अनिता फिलिप यांचे मार्गदर्शन लाभले. तर स्वाध्याय भवन, वडाळा फायलोरेमेडिशन मार्गदर्शन यांच्यातर्फे संध्या माने हिने ‘फायलोरेमेडिशन’ प्रकल्प सादर केला.

च्याशिवाय व्हीपीएम विद्या मंदिर, दहिसर, येथील अगस्ती देशपांडे याने रेश्मा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला प्रकल्प; होली एंजेल्स, मुलुंड पश्चिम येथील अझिझा खानने अनिता राजशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला प्रकल्प; साधना विद्यालय, सायन, येथील निधी गुप्ता याने सिद्धी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला प्रकल्प तसेच जे. जे. अ‍ॅकॅडमी, मुलुंड पश्चिम येथील वृत्ती पटेलने गायत्री राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला प्रकल असे एकूण आठ संशोधनात्मक प्रकल्प सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.