शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
5
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
6
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
7
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
8
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
10
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
11
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
12
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
13
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
14
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
15
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
16
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
17
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
18
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
19
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
20
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका

बालभारतीने ‘संविधान’ बदलले

By admin | Published: June 27, 2017 3:40 AM

पुण्याच्या बालभारतीतर्फे यंदा इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. हिंदीच्या पुस्तकामध्ये ‘भारत का संविधान’ या पानावर शब्दांमध्ये चुका झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुण्याच्या बालभारतीतर्फे यंदा इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. हिंदीच्या पुस्तकामध्ये ‘भारत का संविधान’ या पानावर शब्दांमध्ये चुका झाल्या आहेत. धर्म ऐवजी पंथ आणि शुक्ल ऐवजी शुल्का अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे शब्द चुकीने छापले गेले आहेत की बदल करायचे ठरवून छापले गेले आहेत, याविषयी स्पष्टता द्यावी अशी मागणी ‘टीचर डमोक्रॅटिक फ्रंट’तर्फे (टीडीएफ) केली आहे. हिंदी विषयाच्या पुस्तकात सुरुवातीच्या एका पानावर ‘भारत का संविधान’ छापलेले असते. यामध्ये दुसऱ्या ओळीत गेल्यावर्षीच्या पुस्तकात ‘धर्म -निरपेक्ष’ असा शब्द आहे. पण, यंदाच्या पुस्तकात ‘पंथनिरपेक्ष’ असा शब्द छापण्यात आला आहे. तसेच शेवटून तिसऱ्या ओळीत आधीच्या पुस्तकात ‘शुक्ल सप्तमी’ असा शब्द आहे. नवीन पुस्तकात शुल्का सप्तमी छापण्यात आला आहे. धर्म हा योग्य शब्द आहे. आधी धर्म आहेत. त्यानंतर पंथ आणि संप्रदाय येतात. तरीही धर्म बदलून पंथ असा शब्दाचा उल्लेख केला आहे. तसेच शुक्ला हे आडनाव आहे. मराठीच्या पुस्तकात ‘भारताचे संविधान’ या पानावर प्रस्तावना ऐवजी उद्देशिका शब्द छापण्यात आला आहे. प्रस्तावना म्हणजे सुरुवात आणि उद्देश त्यानंतर येतो. तरीही असे शब्द का छापण्यात आल्याचा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. संविधानासंदर्भातील शब्दांमध्ये बालभारती कसे काय बदल करु शकते. हे शब्द आहेत तसे वापरावेत असा नियम आहे. हे शब्द बालभारतीने स्वत: बदले आहेत. की चुकीने छापले गेले आहेत, याचा खुलासा करावा. या शब्दांमुळे अर्थ बदलत आहेत, हे लक्षात घ्यावे, असे टीडीएफचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी स्पष्ट केले.