शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

बालचित्रवाणी अखेर पडली बंद!

By admin | Published: June 01, 2017 4:03 AM

मुलामुलांचीऽऽऽ, मजेमजेचीऽऽऽ, बालचित्रवाणी... अखेर बुधवारपासून बंद झाली. केंद्र सरकारचे अनुदान बंद झाल्याने

पुणे : मुलामुलांचीऽऽऽ, मजेमजेचीऽऽऽ, बालचित्रवाणी... अखेर बुधवारपासून बंद झाली. केंद्र सरकारचे अनुदान बंद झाल्याने संस्था अडचणीत आल्यानंतर ती कायमची बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यामुळे नव्वदीच्या दशकातील एका मऱ्हाठी पिढीचे बालपण समृद्ध करणारी ही संस्था आता इतिहासजमा झाली आहे. शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी २७ जानेवारी १९८४ रोजी बालचित्रवाणी म्हणजेच राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थेची पुण्यात स्थापना करण्यात आली होती. बालचित्रवाणीने ६ हजार कार्यक्रमांची निर्मिती केली. पुण्यातील बालचित्रवाणीची सर्व स्थावर, जंगम मालमत्ता बालभारतीकडे वर्ग करण्यात येईल. तिथे ई-बालभारतीची स्थापना होणार आहे. बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यक्रम निर्मिती व इतर सर्व खर्चासाठी केंद्र शासनाकडून मिळणारे १०० टक्के अनुदान नंतर बंद झाले. कर्मचाऱ्यांचा पगार एप्रिल २०१४पासून बंद झाल्याने कर्मचारी न्यायालयात गेले. मात्र औद्योगिक कलह कायद्यातील कलमानुसार ५०पेक्षा कमी कामगार असणारी संस्था आर्थिक विवंचनेत सापडल्यास बंद करता येते, असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्यई-बालभारती संस्था कार्यान्वित झाल्यानंतर बालचित्रवाणीचे कर्मचारी ई-बालभारतीसाठी निश्चित केलेल्या आवश्यक पदांची शैक्षणिक अर्हता पूर्ण करीत असल्यास त्यांची गुणवत्तेनुसार निवड होत असल्यास वयाची अट न ठेवता त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे शासनाने आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. दरम्यान, बालचित्रवाणी संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांना एक महिन्याची आगाऊ नोटीस देऊन ३१ मे २०१७पासून सेवामुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.