शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राष्ट्र सेवा दलाची मुले करणार दुष्काळाशी सामना

By admin | Published: May 13, 2017 2:16 AM

राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्रात साने गुरुजी पथकाच्या माध्यमातून श्रमसंस्काराची संस्कृती रुजविली. त्यातून महात्मा गांधींच्या स्वप्नातील आदर्श गाव

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्र सेवा दलाने महाराष्ट्रात साने गुरुजी पथकाच्या माध्यमातून श्रमसंस्काराची संस्कृती रुजविली. त्यातून महात्मा गांधींच्या स्वप्नातील आदर्श गाव, स्वावलंबी गाव उभे करण्याची धडपड होती. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे गावे उजाड आणि टंचाईने ग्रस्त होत आहेत़ ही गरज ओळखून या वर्षी २0 आणि २१ मे रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरजवळच्या पवारवाडी या गावात साने गुरुजींची राष्ट्र सेवा दलातील धडपडणारी मुले, कार्यकर्ते श्रमछावणी भरवून श्रमदान करणार आहेत.पाणी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील १३00 गावांमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेंतर्गत दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने लोक सहभागातला एक उपक्र म सुरू आहे. अभिनेता आमीर खान यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. याकरिता ‘सत्यमेव जयते वॉटर कप २0१७’ ही स्पर्धा सुरू आहे. गावातील आणि शहरातील लोकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने दुष्काळाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.सेवा दलाच्या श्रमसंस्कार चळवळीला अभिनेता आमीर खान यांनी पाणी फाउंडेशनमार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ सुरू करून एक प्रकारे साद दिली आहे. त्याच पद्धतीने सेवा दलाचे कार्यकर्ते दोन दिवस पवारवाडीत जलसंधारण आणि दुष्काळावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या गावकऱ्यांच्या या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन श्रमदान करतील, गावातील लोकांशी संवाद साधतील, अशी माहिती या शिबिराचे समन्वयक आणि राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम यांनी दिली.राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली श्रमछावणीला जाणाऱ्या या पथकात श्रमदानासोबत गावामध्ये दोन दिवस विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. सकाळी ७ ते ११ पर्यंत पवारवाडी या गावामध्ये गावकऱ्यांसोबत श्रमदान आणि संध्याकाळी गावामध्ये लोकांशी संवाद असा भरगच्च कार्यक्र म आहे. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य, अंनिसचे हमीद दाभोलकर, अनिल सूर्यवंशी आणि अनेक मान्यवर यात सहभागी होणार आहेत़