विजय मांडे,कर्जत- जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांची सुरु वात झाली की, महिलांना वेध लागतात ते पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची साठवण करण्याचे. तसेच ज्यांच्या कुटुंबात विवाह सोहळे आहेत त्यांचीही मसाला करण्याची लगीन घाई झाली आहे. जेवणातील महत्त्वाचा घटक भाजी आणि त्यासाठी लागणारा मसाला महिला स्वत: जातीने लक्ष देऊन बनवितात. सध्या मिरचीच्या खरेदीसाठी कर्जत बाजारपेठेत मोठी गर्दी दिसत आहे, या खरेदीत मोठी उलाढाल होत असते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीच्या भावात ३० ते ५० टक्के दर कमी झाल्याने यंदा मिरची गोड झाल्याने महिला वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे.कर्जत बाजारपेठ मिरचीच्या खरेदीसाठी पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे, या बाजारपेठेत लोणावळा, बदलापूर, कल्याण, पनवेल आदी भागांतील महिला येऊन मिरचीची खरेदी करतात. मिरची खरेदी केली की हळद आलीच, जेवढ्या प्रमाणात मिरची आणि हळदीला मागणी आहे तेवढीच मागणी गरम मसाल्याला आहे. पूर्वी कर्जत बाजारपेठेत मिरचीविक्र ीची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. त्या मानाने मिरचीची विक्र ी करणारी दुकाने कमी झाली आहेत. मात्र, जी दुकाने आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. कर्नाटक, आंध्र, सोलापूर येथून मिरची विक्रीसाठी येत असते. कर्जत बाजारपेठेत गंटुर, बेडगी, शंकेश्वरी, लवंगी, पट्टी आणि साधी मिरची येत आहे. यंदा हळदीला १०० रु पये किलो (गेल्या वर्षी १५० रु पये) असा दर आहे. पावसाळ्यापूर्वी वर्षभर पुरेल एवढा मसाला, हळद करून ठेवण्यासाठी महिलांची धडपड सुरू असते. सध्या मिरची, हळद, गरम मसाल्याच्या खरेदीसाठी कर्जत बाजारपेठेत गर्दी दिसत आहे.>यंदा हळदीला १०० रुपये किलो (गेल्या वर्षी १५० रु पये) असा दर आहे. पावसाळ्यापूर्वी वर्षभर पुरेल एवढा मसाला, हळद करून ठेवण्यासाठी महिलांची धडपड सुरू असते. >मिरचीचे दर प्रतिकिलो प्रमाणेमिरचीचा प्रकारयंदाचा दरगत वर्षीचा दरबेडगी १४० १८०-२२०शंकेश्वरी१२० १६०लवंगी९० १४०-१५०गंटुर७०१३०-१५०काश्मिरी १६०२००-२२०
यंदा मिरचीचे दर ३० ते ५० टक्क्यांनी उतरले
By admin | Published: February 27, 2017 1:55 AM