फलटण (जि़सातारा) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे शनिवारी सायंकाळी पावणोसातच्या सुमारास मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते 75 वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. फलटण तालुक्यातील गिरवी या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. माजी आमदार चिमणराव ऊर्फ सूर्याजीराव शंकरराव कदम हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कदम हे 198क् ते 1995 या कालावधीत सलग तीन वेळा फलटण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते.