शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

पैसे उकळण्यासाठी घेतला चिमुरडीचा जीव

By admin | Published: July 06, 2017 3:21 AM

केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिव, दमन येथून स्वस्तात मिळणारी दारू आणून ती गावी अकोल्यात विक्री करायची, त्यातून मिळणाऱ्या पैशांवर मजा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिव, दमन येथून स्वस्तात मिळणारी दारू आणून ती गावी अकोल्यात विक्री करायची, त्यातून मिळणाऱ्या पैशांवर मजा करायची. उधारीवर पैसे घ्यायचे, परतफेड करता आली नाही तर भुरट्या चोऱ्या करायच्या, अशी कृत्य करणाऱ्या बेरोजगारांनी पैशासाठी तनिष्का अमोल आरुडे या चार वर्षाच्या बालिकेचा बळी घेतला. ज्यांच्या इमारतीत खोली भाड्याने घेऊन राहत होते, त्यांच्याच मुलीचे अपहरण करून खून केला. खुनानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. अशा दोन बेरोजगार आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. चऱ्होलीतील वडमुखवाडी येथून चार वर्षाची तनिष्का ही बालिका २८ जूनपासून बेपत्ता झाली होती. मात्र, तिचा खून करून मृतदेहाची अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर येथे विल्हेवाट लावणाऱ्या शुभम विनायक जामनिक (वय २१), प्रतीक साठले (वय २३ ) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. शुभमला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. तर प्रतीक साठले यास ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अमोल आरुडे यांच्याकडे शुभम जामनिक याची आई आणि बहीण भाड्याने राहाते. तो नेहमी अकोल्याहून चऱ्होलीत येत असे. दमन येथून दारू आणून अकोल्यात विक्री करण्यासाठी आरोपींनी एक मोटार भाड्याने घेतली होती. भाडे नियमितपणे देऊ न शकल्याने त्यांच्यावर कर्ज झाले होते. तनिष्काच्या वडिलांकडून पैसे मिळतील, या अपेक्षेने त्यांनी हे कृत्य केले. तनिष्काचे वडीलअमोल यांनी त्यांची पत्नी योगीता यांना किराणा दुकानात थांबवले. ते गाडी सर्व्हिसिंगसाठी चिंचवडला गेले. योगीता मोठ्या मुलीला घेण्यासाठी शाळेत गेल्या त्या वेळी तनिष्का घरात खेळत होती. खाऊचे आमिष दाखवून तनिष्काला एका खोलीत घेतले. वडमुखवाडी येथेच तिचा गळा दाबुन खून केला. मोठ्या बॅगेत भरून मोटारीतून मृतदेह अकोल्यातील मूर्तिजापूरला नेला. विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळला,अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांनी पुरला. तनिष्का १२ च्या सुमारास गायब झाली. तर शुभम दुपारी ३ वाजता चऱ्होलीतून निघून गेला होता. हे संशयास्पद वाटल्याने दिघी पोलिसांनी त्याच्याशी फोनवरून संपर्क साधून त्याला बोलावून घेतले. चौकशी केली.पोलिसांचे पथक मूर्तिजापूरला गेले. तेथून त्यांनी मृतदेह पुरल्याचे ठिकाण शोधले. अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, सहायक पोलीस आयुक्त वसंत तांबे, दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी भुजबळ, बाळासाहेब टोके, हरीष माने, शिवाजी भुजबळ, दिनेश डोंबळे, सुनील गवारी, बबन वन्ने, रवि नाडे, शेखर शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. बॅगेत भरलेल्या मृतदेहाचा मोटारीतून प्रवासचऱ्होली ते अकोल्यातील मूर्तिजापूर हे सुमारे ६४० किलोमीटरचे अंतर आहे. आरोपींनी तोंडावर उशी ठेवून तनिष्काचा चऱ्होलीत खून केला. विल्हेवाट लावण्यासाठी तो मोटारीतून अकोला येथे नेला. पंचविशीतील या तरुणांनी अत्यंत शिस्तबद्धरीत्या हे कृत्य केले. मुलीचे अपहरण, खून, नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. तनिष्काचा मृतदेह जाळला. परंतु अर्धवट जळाल्याने त्यांनी तो पुरला. पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.