मुंबई : लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या ‘संस्काराचे मोती’ उपक्रमाच्या निमित्ताने नुकतीच महाराष्ट्रातील चिमुरडय़ांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करीत भरभरून शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीत लोकमत वृत्तपत्र समूहाचे अभिनंदन केले. याप्रसंगी, लोकमत वृत्तसमूहाच्या ‘रेस’ टीमचे उपाध्यक्ष वसंत आवारे आणि खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.
यंदा जुलै ते सप्टेंबरदरम्यान ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते आठवीर्पयतच्या विद्याथ्र्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमात महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण 37 जिल्ह्यांतील विद्यार्थी सहभागी होतात. या जिल्ह्यांतील तीन हजार शाळांचा या उपक्रमात सहभाग असतो. यंदा एकूण 3क् लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या उपक्रमाद्वारे एका ठरावीक विषयाचे शालेय विद्याथ्र्याच्या दृष्टिकोनातून विविधांगी पैलूंनी विश्लेषण करण्यात येते. यंदा ‘ग्रीन किड्स : जगा इको लॉजिकल’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
‘संस्काराचे मोती’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्याथ्र्याना आकर्षक बक्षिसेही दिली जातात. शिवाय, विद्याथ्र्याना मुंबई - दिल्ली हवाई सफरही घडविली जाते. या हवाई सफरीचे वैशिष्टय़ म्हणजे, ज्या विद्याथ्र्यानी केवळ कागदावर किंवा आकाशातच विमान पाहिलेले असते, त्या महाराष्ट्राच्या कानाकोप:यातील विद्याथ्र्याना प्रत्यक्ष सफरीचा अनुभव आनंददायी असतो. या उपक्रमाअंतर्गत यंदाही ‘हवाई सफर’ योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. या भेटीत ‘रेस’ टीमचे उपव्यवस्थापक सोमनाथ जाधव, सहायक व्यवस्थापक शिरीष म्होरसकर, सिनिअर एक्ङिाक्युटीव्ह कैलास बडगुजर, वितरण एक्ङिाक्युटीव्ह अमर पाटील यांचाही सहभाग होता. (प्रतिनिधी)
व्यस्त दिनक्रमात घेतली भेट
शासनाचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार असल्याने पंतप्रधान मोदी यांचा दिनक्रम अतिशय व्यस्त होता. मात्र तरीही व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून गुरुवारी मोदी यांनी भेटीसाठी वेळ काढला.
मोदींनी केली स्वाक्षरी!
‘संस्काराचे मोती’ या उपक्रमाबद्दल जाणून घेत पंतप्रधान मोदी यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. शिवाय, यंदाच्या ‘ग्रीन किड्स’च्या प्रवेशिकेवर स्वाक्षरीही केली.
मराठीतून गप्पा!
पंतप्रधान मोदी यांनी या भेटीत चिमुरडय़ांशी मराठीतून संवाद साधला. त्यामुळे चिमुरडय़ांनीही मोदी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याप्रसंगी, मोदी यांनी या विद्याथ्र्याना हवाई सफरीच्या अनुभवाविषयी विचारले असता, विद्याथ्र्यानी दिलखुलास उत्तरे दिली. या दिलखुलास संवादांमुळे मोदी यांच्या चेह:यावरही हास्य उमटले.