मुंबई : चीनच्या सध्या घसरलेल्या निर्यातीचा फायदा घेऊन जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवण्यासाठी दर्जेदार उत्पादन निर्मितीची कास धरायला हवी. यातूनच आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय उत्पादनांचे प्रभुत्व आणखी विस्तारेल, असे मत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे उपसचिवक सुनील कुमार यांनी व्यक्त केले.येत्या २१ आणि २२ मार्चला मुंबईत रसायन, प्लॅस्टिक, बांधकाम साहित्यनिर्मिती क्षेत्र आणि पूरक उत्पादने यांच्या निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य मंत्रालयाने कॅम इंडिया २0१८ या परिषदेचे आयोजन केले आहे. भारतातील उत्पादन गुणवत्तेची आणि निर्यात क्षमतेची ओळख पटावी यासाठी जगातील सर्वात मोठे उत्पादक या परिषदेत सहभागी होणार आहेत. या चारही उद्योग क्षेत्रातून देशाची निर्यात ४२ अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा २0१0 साली गाठेल, असे उद्दिष्ट सरकारने निश्चित केल्याचे यावेळी सुनील कुमार यांनी सांगितले.
‘चीनच्या निर्यातीचा फायदा घेणार’
By admin | Published: March 04, 2017 1:51 AM