डहाणू : तालुक्यातील चिंचणी गावात गेल्या दोन दिवसांंपासून काळोख पसरला असून महावितरण ती सुरळीत करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे. वीज महावितरण कंपनीच्या वसई, पालघर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील चिंचणी गावात वीज महावितरण कंपनीचया सेवेचा बोजवारा उडाला असून येथे एक तासही वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने येथील घरोघरी चालणाऱ्या डायमेकींगचा व्यवसाय धोक्यात आला आहे. येथे वीजेच्या तारा तुटण्याबरोबरच फ्युज, डिओ उडण्याचे प्रकार दिवसातून पंधरा ते वीस वेळा होतात. शिवाय बोईसर येथील १३२ के.व्ही.मध्ये रात्रदिवस बिघाड होत असल्याने चारचार तास वीजपुरवठा खंडित होणे नित्याची बाब झाली आहे.या प्रकारामुळे हजारो डायमेकर्स कारागिरांची आर्थिक कुचंबना होत आहे. याबाबतीत चिंचाणी ग्रामपंचायतीने वसई येथील अधीक्षक अभियंता (वीज महावितरण कंपनी) यांना येथील परिस्थिती बाबतीत पत्र लिहून गेल्या पन्नास वर्षापूर्वीच्या वीजेच्या सडलेले खांब, ठिसूळ विजेच्या तारा, कमकुवत ट्रान्सफार्मर इत्यादी नव्याने बसविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)>दिवसभर विजेचा खेळखंडोबामुळे येथील नागरिकांचा संयम तुटला आहे. काल (गुरूवार) रोजी रात्री ९ वाजता चिंचणी खाडीनाका येथे विजेच्या तारा तुटून पडल्या तसेच इतर जीर्ण, जुनाट साहित्यामध्ये बिघाड झाल्याने रात्रभर नागरिकांना अंधारा काढावी लागली. आज दुपारी ३ वाजता वीजपुरवठा सुरू करण्यात आले. परंतु १८ तासानंतरही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत होता.
चिंचणी १८ तासांपासून अंधारात
By admin | Published: August 06, 2016 2:49 AM