चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार! राहुल कलाटे की नाना काटे आज समजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 07:46 AM2023-02-07T07:46:31+5:302023-02-07T07:47:13+5:30

Chinchwad Assembly by-election: चिंचवड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून मंगळवारी सकाळी अर्ज सादर करण्यात येणार आहे, उमेदवार ऐनवेळी जाहिर करू, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले

Chinchwad Assembly by-election NCP will contest! Rahul Kalate or Nana Kate will understand today | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार! राहुल कलाटे की नाना काटे आज समजणार

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार! राहुल कलाटे की नाना काटे आज समजणार

googlenewsNext

पिंपरी - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. गेले तीन दिवस राजकीय खलबते सुरू आहेत. ''चिंचवड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून मंगळवारी सकाळी अर्ज सादर करण्यात येणार आहे, उमेदवार ऐनवेळी जाहिर करू, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सोमवारी रात्री अकरा वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे  महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबतची उत्सुकताच ताणली गेली आहे. राहुल कलाटे की नाना काटे हे उमेदवारी दाखल करतानाच समजणार आहे.

विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक राहिलेले आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार जाहीर झालेला नाही. काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे.

डिनर डिप्लोमसी ...
किवळेमधील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार, आमदार सुनील शेळके, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी इच्छुक उमेदवारांचे म्हणणे पवार यांनी ऐकून घेतले. तसेच सर्व नेत्यांबरोबर भोजन घेतले. डिनर डिप्लोमसी केली, मात्र, उमेदवार जाहीर केलं नाही. दरम्यान राहुल कलाटे आणि नाना काटे यांच्या नावावर चर्चा झाली असल्याचे समजते. मात्र, या दोघांपैकी कोणाला संधी देणार हे गुलदस्त्यात आहे.

बैठकीनंतर बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
अजित पवार म्हणाले, ' महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविण्यात येणार आहे.  सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने उमेदवारी अर्ज सादर करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यात येणार आहे. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीद्वारे निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज भरण्यात येईल.''

Web Title: Chinchwad Assembly by-election NCP will contest! Rahul Kalate or Nana Kate will understand today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.