मुंबई : भारतीय सीमेवर विश्वासघात करुन घुसखोरी करणाऱ्या चीनचा निषेध म्हणून राज्यात अनेक ठिकाणी चिनी साहित्याची होळी करण्यात आली. लातूर, अकोला, परभणी, अहमदनगर, जळगाव आदी ठिकाणी चीनविरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले.लातूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी नगरात फिजीकल डिस्टन्सचे पालन करीत आंदोलन करण्यात आले.अकोल्यात शहीद भारतीय सैनिकांना अकोल्यात आम आदमी पक्षाने श्रद्धांजली अर्पण करून चिनी उत्पादनांची जाहीर होळी करण्यात आली. चीन सरकारच्या धोरणाचा निषेधही व्यक्त केला आहे. सीमेवर चकमकीत शहीद झालेले कमांडो संतोष कुमार यांच्यासह २० भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अहमदनगरमध्ये दिल्लीगेट येथे शिवसेनेने तर भिंगारला मुस्लिम समाजाने आंदोलन केले. भिंगारमध्ये चायना माल विकू देणार नाही. तसेच कोणीही चिनी माल घेणार नाही, अशी शपथ घेण्यात आली.चीनी वस्तूंच्या आॅर्डर रद्द कराचेंबर आॅफ ट्रेड अँड कॉमर्सने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना चिनी वस्तूंच्या नवीन आॅर्डर दिल्या, त्या रद्द कराव्यात, असा संदेश पाठविला आहे. व्यापारी व विक्रेत्यांमध्ये जनजागृती करावी, जिल्हा व्यापारी महासंघ याविषयी अभियान राबवणार आहे.
राज्यात चायनीज वस्तूंची होळी; घोषणा देत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 4:50 AM