शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

चिनी मालाच्या विक्रीत ६० टक्क्यांनी घसरण

By admin | Published: November 02, 2016 2:12 AM

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने केलेले पाकिस्तानचे समर्थन चीनला चांगलेच भोवले आहे.

मुंबई : उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने केलेले पाकिस्तानचे समर्थन चीनला चांगलेच भोवले आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या सोशल मीडियावरील अभियानामुळे चिनी मालाची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्क्यांनी घसरली आहे. या वेळी ग्राहकांबरोबरच व्यापाऱ्यांनी चिनी मालाकडे कानाडोळा केल्याने चिनी बाजारपेठा चांगल्याच गडगडल्या आहेत. शिवाय, या चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे ‘स्वदेशी’ची भावनाही वाढल्याचे दिसून येत आहे.देशभरातील ग्राहकांनी चिनी बाजारातील वस्तूंऐवजी भारतीय माती, प्लास्टिक आणि कागदांपासून बनविलेल्या सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या. चिनी मालावरील बहिष्काराच्या अभियानामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जोडले गेल्याने व्यापाऱ्यांनी यंदा चिनी मालाच्या आयातीसाठी उत्साह दाखविला नाही. याउलट, व्यापाऱ्यांनी यंदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वदेशीचा नारा स्वीकारून दुकानांमध्ये ‘मेक इन इंडिया’चे बोर्ड्सही लावले होते.देशातील २० शहरांमधील म्हणजेच दिल्ली, मुंबई, नागपूर, जयपूर, कानपूर, अहमदाबाद, भोपाळ हे चिनी मालाच्या विक्रीसाठी मुख्य केंद्रे मानली जातात. या शहरांतील व्यापारी संघटनांशी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स संघटनेने संवाद साधत केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.याविषयी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी सांगितले की, चिनी मालावरील बहिष्कार अभियान सोशल मीडियामुळे घराघरांत पोहोचले. यामुळे भारतीय कागद आणि मातीपासून बनविलेल्या सजावटीच्या वस्तू आणि भारतीय चॉकलेट्स, मिठाई, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि गॅझेट्सची खरेदी अधिकाधिक वाढली. फटाक्यांच्या बाबतीतही ‘मेड इन चायना’पेक्षा तामिळनाडू येथील शिवकाशी शहरातील फटाक्यांना अधिक पसंती मिळाली आहे. तसेच, चिनी मालाला पर्याय म्हणून घरगुती वस्तू, व्यापारी पेठा आणि छोट्या उद्योजकांची अधिकाधिक निर्मिती व्हायला हवी, असे मत भरतिया यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)