मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय घडामोडींना वेग येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत खुलासा करताना वैजापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ह्या फक्त अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीला दोन महिने शिल्लक राहिले असल्याने लोकांकडून अशा गोष्टी जाणीवपूर्वक पेरल्या जात असल्याचे ही ते म्हणाले.
येवला मतदारसंघात भुजबळांना आगामी विधानसभा अडचणीची जाणार असल्याने ते वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चेचे आमदार चिकटगावकर यांनी खंडन केले आहे. निवडणुका जवळ आल्या की काही लोकांकडून अशा अफवा पसरवल्या जातात. छगन भुजबळ यांनी स्वताः कुठे अधिकृतरीत्या असा खुलासा केला नसल्याचे ही चिकटगावकर म्हणाले. अधिवेशनात भुजबळांशी माझी भेट झाली पण त्यावेळी सुद्धा त्यांनी याबाबतीत कोणतेही चर्चा केली नसल्याचे चिकटगावकर म्हणाले.
त्यांना जरा वैजापूरमधून उभे राहायचे असतील तर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बोलतील. स्थानिक आमदार म्हणून मला बोलतील व या विषयवार बैठक होईल त्यानंतर निर्णय होईल. कुणीतरी बोलले म्हणून भुजबळ वैजापूरमधून लढणार असे होत नाही, तसेच भुजबळ यांनी अशी कोणतेही इच्छा व्यक्ती केली नसल्याचेही चिकटगावकर म्हणाले.