Chipi Airport : या विमानतळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 01:56 PM2021-10-09T13:56:15+5:302021-10-09T13:56:35+5:30
कोकणाला निसर्गाचं वरदान आहे, कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं : अजित पवार
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिपी विमानतळाचं अखेर सर्वांसाठी खुला होत आहे. या विमानतळाच्या उद्धाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), रामदास आठवले सुभाष देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) हेदेखील उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त करत या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं म्हटलं.
"या विमातळाचा इतिहास मोठा आहे. एकट्या दुकट्यानं काही होत नाही. कोकणाला निसर्गाचं वरदान आहे. कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. सध्या चिपी विमानतळाचा अडीच किमीचा रन वे आहे. आम्ही येताना पाहत होतो आणि चर्चाही केली. याच्या बाजूला मोकळी जागाही आहे. हा रन वे साडेतीन किमीचा होऊ शकतो," असं पवार यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतल्याचंही सांगितलं. तसंच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही गडकरींचीही भेट मागितली असल्याची माहिती दिली.
महामार्गासाठी असणाऱ्या अडचणी आम्ही सोडवणार आहोत. गोव्याला जाणारा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. गडकरींनी महाराष्ट्राला भरीव मदत केली. आपण मुख्यमंत्र्यांसोबत बोलून प्रश्न सोडवू आणि आर्थिक जबाबदारीही उचलू असं गडकरी म्हणाले, असल्याचंही पवार यांनी नमूद केलं. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि शिक्षणासाठी मेडिकल कॉलेजही मंजुर करण्यात आलं आहे. त्याचा फायदा सर्वांना होणार आहे. पर्यंटनाच्या बाबती आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे याचं लक्ष आहे. त्यांनी आणलेले प्रस्तावही विकासाच्या दृष्टीनं आम्बी मंजूर करत असतो. पुढील काळात कोकणातील आर्थिक परिस्थिती अधिक उत्तम व्हावी अशी अपेक्षा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.