"काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात?", व्हिडीओ ट्विट करत चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 06:08 PM2022-07-20T18:08:45+5:302022-07-20T18:14:32+5:30
Nana Patole: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई - महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये महिलेसोबत दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले हे असल्याचा दावा करत चित्रा वाघ यांनी तो नाना पटोले यांना टॅग केला आहे. तसेच काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात? असा खोचक प्रश्न विचारला आहे.
भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत यााबाबत सवाल उपस्थित केले आहेत. याबाबत चित्रा वाघ म्हणाल्या की, माझ्याकडे हा व्हिडीओ आला तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं? तो व्हिडीओ मी पुन्हा एकदा चेक केला. तो बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेला आहे. तो व्हिडीओ सामान्य व्यक्तीचा नाही, तर तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी ट्विट करत मी नानांनाच विचारलं आहे. मात्र त्यांच्याकडून या व्हिडीओबाबत अद्याप काही उत्तर आलेलं नाही.
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….🤭🫣@NANA_PATOLE@INCIndia@MumbaiPMC@INCMumbaipic.twitter.com/7GnKQ2t6jW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 20, 2022
दरम्यान, हे माझ्या बदनामीचं कारस्थान असल्याचे नाना पटोले यांनी या व्हिडीओबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले आहे. तसेच आमची लिगल टीम त्याबाबत तक्रारी करत आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
मात्र हा व्हिडीओ कुणाचा, तसेच तो कुणी व्हायरल केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच लोकमतही या व्हिडीओच्या विश्वासार्हतेची कुठलीही पुष्टी करत नाही.