मुंबई : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. हिंगणघाट च्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला. कोणत्या शतकातं आहोतं आपण,दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न कमी न होता वाढताहेत. बाई म्हणून तिच्या कतृत्वाच्या कहाण्यांपेक्षा अत्याचाराच्या कहाण्या होताहेत. कोण जबाबदार याला आणि कोण घेणार याची जबाबदारी. आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला, असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्यात.