मुंबई : : हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना, निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५)संध्याकाळच्या सुमारास घडली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लासलगावमध्ये घडलेल्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट करत म्हंटले आहे की, लासलगावमध्ये पुन्हा एकदा अतिशय वेदनादायी घटना घडली आहे. आज त्या महिलेला जिवंत जाळण्यात आलं. तर गेल्या 15 दिवसात ही 7 वी घटना आहे. कुठेतरी जाळण्याच सत्र या राज्यात चाललंय असे वाटू लागले आहे. त्यामुळे हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र असूच शकत नसल्याचं चित्रा वाघ म्हणाल्यात.
पेट्रोल पंपावर मिळणारे सुट्टे पेट्रोल आणि अॅसिडसदृश केमिकल सहज बाजारात विकत मिळतात, त्यामुळे त्याच्यावर तात्काळ बंदी घालावी. तर ह्या हरामखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने उपयोजना करावीत अशी मागणी सुद्धा चित्रा वाघ यांनी यावेळी केली.
तसेच आपण कोणत्या शतकातं आहोत, ही मुलगी असण्याची अवहेलना आहे का? दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न वाढत चाललेत. गेल्या १५ दिवसातली महिलेला जिवंत जाळण्याची हि ७ वी घटना असून, आपण कुठे चाललोयं असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावेळी विचारला.