शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

चॉकलेटचा बंगला

By admin | Published: July 02, 2017 5:51 AM

लहानपणी बडबडगीतांत जवळपास प्रत्येकानेच चॉकलेटच्या बंगल्याचे वर्णन केले असेल, त्याचे स्वप्न पाहिले असेल, कधी ना कधी तो पाहायला-अनुभवायला

- शब्दांकन : मिलिंद बेल्हे

लहानपणी बडबडगीतांत जवळपास प्रत्येकानेच चॉकलेटच्या बंगल्याचे वर्णन केले असेल, त्याचे स्वप्न पाहिले असेल, कधी ना कधी तो पाहायला-अनुभवायला मिळावा अशी कल्पना केली असेल. ती कल्पना सत्यात यावी, एवढी आता चॉकलेटची दुनिया बदलली आहे. नेहमी तोंडात टाकली जाणारी रॅपरमधली चॉकलेट किंवा व्हॅनिला आइस्क्रीमच्या डोक्यावर ओतलेले लिक्विड चॉकलेट असेल... केक, पुडिंग, ब्राऊनी, लाव्हा, दुधात घालायची ड्रिंक यातून चॉकलेटची दुनिया आपल्याभोवती फेर धरते. पण त्याही पलीकडे चॉकलेटने अनेकांच्या जिव्हा चटावल्या असतील. त्या कशा? ही चॉकलेटची चंदेरी, सोनेरी, चमचमती दुनिया वाढतेय तरी कशी? ७ जुलैच्या ‘चॉकलेट डे’ निमित्त तिची सफर घडवताहेत चॉकलेटियर्स... शाल्विक शितूत आणि अमर मौर्य.गात सर्वात आवडता किंवा लोकप्रिय फ्लेव्हर असेल तर तो चॉकलेटचा. खाण्याचे पदार्थ, ड्रिंक, केक, डेझर्ट, मिठाया, आइस्क्रिम सर्वत्र चॉकलेट फ्लेव्हरचा मुक्त संचार असतो. हा झाला फ्लेव्हर. पण बार किंवा कॅण्डी अशा स्वरूपात खाल्ल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये आपल्या नेहमीच्या कल्पनेपलिकडे भरपूर प्रकार आहेत. अनेक प्रयोग होत आहेत. एकदा लोकांना चॉकलेट आवडतं हे लक्षात आल्यावर त्यांची दुनिया अधिकाधिक चॉकलेटी करण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत. परदेशात तर नुसत्या चॉकलेटची स्टोअर्स चालतात, यावरूनच चॉकलेटची महती कळू शकेल. नेहमीच्या चॉकलेटपलिकडे जाऊन विचार केला, तर त्याचे तीन बेस फॉर्म मिळतात. त्यातील पहिला डार्क कम्पाऊंड. हे चवीला थोडे कडवट असते. मिल्क कम्पाऊंड- यात साखरेची पातळी- लेव्हल हाय असते. तिसरा व्हाइट कम्पाउंड. यातही कोको नसते, पण हे फॅक्टरी मेड असते. ते अ‍ॅसिड फायरने बनवतात. चॉकलेट बनवण्यासाठी डार्क कम्पाऊंड आणि मिल्क कम्पाऊंडचाच वापर होतो. त्यातील दोन्हीचे प्रमाण तुम्ही किती कमी-जास्त करता, त्या ब्लेण्डवर तुमच्या चॉकलेटची चव ठरते. त्या चॉकलेटची रेसिपी आवडली की त्या चवीसाठी वर्षानुवर्षे तेच चॉकलेट खाल्ले जाते. त्यातील गोडवा किती हवा हेही त्यात महत्त्वाचे ठरते. अतीगोड चॉकलेट आपण फार खाऊ शकत नाही. त्याचा एखाद-दुसरा तुकडा पुरेसा होतो. पण एकदा एक चव पसंत पडली, तर ती टिकवण्याचे सिक्रेट जपावेच लागते. ही डार्क चॉकलेट ज्या कॉफी बीन्सपासून बनवतात, त्या देशी आहेत की परदेशी तेही महत्त्वाचे असते. देशी असल्या तरी कोणत्या प्रदेशातील, कोणत्या वातावरणातील आहेत, त्यावर त्यांची चव ठरते. तेच परदेशाच्या बाबतीत. त्यावर त्यांची किंमतही ठरते. मग त्या बीन्सपासून मॉर्डे, ड्युक्स, व्हॅन लीअर, मार्को अशा कंपन्या डार्क चॉकलेट बनवतात. मोठमोठ्या हॉटेलांना-कंपन्यांना त्याचा पुरवठा होतो आणि त्याच्या आधारे मग तुमच्या चॉकलेटची रेसिपी बनते. समजा, त्यात क्रॅकल्स घालायचेत, तर ते रेडीमेड मिळतात. रोस्टेड ड्रायफ्रूड त्यात घालता येतात. व्हाइट आणि डार्क चॉकलेट एकत्र करून मार्बल चॉकलेट हा सुंदर प्रकारही हल्ली उपलब्ध आहे. लिक्विड चॉकलेटमध्येही डार्क आणि व्हाइट चॉकलेटचाच बेस असतो, पण त्याचा लिक्विड फॉर्म टिकावा म्हणून ते वितळवताना त्यात बटर क्रीम, कोको पावडर घालतात. साधारण १७२ डिग्री सेल्सियसवर ते गरम करून झपाट्याने थंड केलं जातं. त्यामुळे त्याचे क्रिमी, सॉसी असे स्वरूप (टेक्श्चर) टिकून राहते. परदेशी कंपन्यांसोबत आता भारतीय कंपन्याही ते बनवू लागल्या आहेत. त्यातही आपल्याकडचा मधाचा फ्लेवर खूप चांगला आहे. मेल्ट केलेल्या चॉकलेटला वेगवेगळे आकार देऊन त्यातही स्पेशलायझेशन केले जाते. एकंदरीतच चॉकलेटही कात टाकतेय. रंगरूप बदलतेय. दिवसेंदिवस पर्सनल होतेय. त्यामुळेच आणखी लोकप्रियही होतेय. त्यामुळे एकदा तरी आपल्या नेहमीच्या चॉकलेटपलिकडे जाऊन ही वेगळी दुनिया चाखून पाहायलाच हवी.  चॉकलेटमधून पर्सनल टचहल्ली होममेड चॉकलेटचा ट्रेंड वाढतोय. चॉकलेटची पॅकिंग बदलतेय. त्यासाठी खूप आकर्षक बॉक्स मिळतात. त्यामुळे भेट म्हणून देण्यासाठी चॉकलेट हा खूप चांगला पर्याय म्हणून निवडला जातो. तुम्ही एखाद्या प्रसिद्ध कंपनीचं चॉकलेट घेतलं, तर त्याचं पॅकिंग सेम असतं. मोठ्ठ्या बॉक्समध्ये चार-पाचच चॉकलेट येतात. त्यापेक्षा होममेड चॉकलेट घेतलीत, तर वेगवेगळ््या आकाराची, त्यात वेगळी फिलिंग असलेली, वेगळ््या चवीची खूप चॉकलेट घेता येतात. तुमच्या मागणीनुसार तुम्ही ती किती ग्रॅम घ्यायची ती ठरवू शकता. हव्या त्या पॅकिंगचा पर्याय निवडू शकता.त्यातून त्याला पर्सनल टच देता येतो. दिवाळीत चॉकलेटला खूप मागणी असते. पूर्वी मिठाई दिली जायची, पण माव्याचे पदार्थ लवकर खराब होतात. त्यात बरेचदा भेसळ असते. त्यापेक्षा चॉकलेट हा चांगला, टिकाऊ पर्याय असतो. शिवाय तुम्ही कार्टुन, झाडे, घरे-बंगला, सुंदर आकार, वेगवेगळे मोल्ड निवडू शकता. ही सुविधा तुम्हाला इतरत्र मिळत नाही. स्ट्रॉबेरी चॉकलेट : आम्ही जेव्हा चॉकलेट बनवली, तेव्हा वेगळेपणा आणताना त्याच्या फिलिंगमध्ये स्ट्रॉबेरीचा वापर केला. तो सर्वांना जास्त आवडला. व्हॅनिला, मँगो, पायनॅपल फ्लेव्हरही होते, पण स्ट्रॉबेरीची चव सर्वात जास्त पसंतीस उतरली. त्यामुळे चॉकलेटमध्येही लोकांना वेगळी चव हवी आहे, बदल हवा आहे हे आमच्याही लक्षात आले. चॉकलेट रूम : अनेक हॉटेलच्या किचनमध्ये तर स्पेशल चॉकलेट रूम असते. त्यात चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे टेम्परेचर सेट केलेले असते. ते मेन्टेन केलेले असते. तिथे आम्ही चॉकलेटचा सांताक्लॉज बनवला होता. त्याला खाण्याचे कृत्रिम रंग वापरून मस्त सजवलाही होता. चॉकलेट सॅण्डवीच : चॉकलेटचे सॅण्डवीचही हल्ली खूप लोकप्रीय आहे. केक हा जसा बेस असतो, तसाच ब्रेड हा बेस म्हणून त्यात वापरला जातो. त्यामुळे अनेकांना तो आवडतो. चॉकलेटमध्ये फ्रूट, ड्रायफ्रूटसोबतच वाइन, व्हिस्कीही वापरली जाते. अर्थात त्याचे प्रमाण खूप कमी असते. पण फ्लेव्हर म्हणून तोही अनेकांना आवडतो. चॉकलेटचा बुडबुडा : चॉकलेटचा बुडबुडा म्हणता येईल असा एक प्रकार हल्ली लोकप्रीय होतोय. ज्या पदार्थावर तो वापरायचा अहे. त्यावर मॉलिकल्चर गॅस्ट्रॉनॉमी पद्धतीने अंड्याच्या बलकासारखा चॉकलेटचा बुडबुडा किंवा बबल बनवला जातो. तो पदार्थावर ठेवतात आणि तुम्ही खाताना तो फोडला, की त्यावरून चॉकलेट ओघळून साऱ्या दिशांनी वाहून त्या पदार्थावर पसरते. त्याची अनेकांना गंमत वाटते. तसेच चॉकलेट स्पेअर्सही अनेकांना आवडतात.