औंध : माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांची औंध भागात मोठी पकड असल्याने औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचाच झेंडा फडकेल, अशी अटकळ असताना जनतेने भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करत कमळावर पसंतीची मोहोर उमटवली आहे.महापालिका निवडणुकीचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करताना भाजपाने निवडून येण्याची क्षमता या निकषाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याचा फटका पक्षाचा झेंडा हाती घेऊन काम करणाऱ्या अनेक निष्ठावंतांना या प्रभागात बसला. घाऊक आयातीमुळे अनेक पदाधिकाऱ्यांची तिकिटे कापली गेली. त्यामुळे तिकीटवाटप प्रक्रियेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तथापि, या घडामोडींचा या प्रभागातील भाजपाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही. ब गटात विद्यमान नगरसेविका संगीता गायकवाड विरुद्ध अर्चना मुसळे या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बोपोडी भागात संगीता गायकवाड यांना चांगले मताधिक्य मिळाले. मात्र, होमपीचवर त्यांना जनतेने साफ नाकारल्याचे मतपेटीच्या निकालातून दिसून आले. या चुरशीच्या लढतीमध्ये अर्चना मुसळे यांनी बाजी मारली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या पौर्णिमा रानवडे यांनी ९३३० इतकी लक्षवेधी मते घेतली. अ गटात मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या विद्यमान नगरसेविका अर्चना कांबळे यांचा सुनीता वाडेकर यांनी ८०८२ मतांनी मोठा पराभव केला. ज्येष्ठ काँग्रेस नेते चंद्रकांत छाजेड यांच्या निधनाने आनंद छाजेड यांना बोपोडी भागात मतदारांची सहानुभूती मिळाली. ते सुमारे ३५०० मतांनी आघाडीवर राहिले. मात्र औंध भागात ही आघाडी कायम राखण्यात त्यांना अपयश आले. या भागात शिवसेनेचे नाना वाळके यांनी चांगली मते मिळवली. याचा फटका आनंद छाजेड यांना बसला. विजय शेवाळे सुमारे ३५०० मतांनी विजयी झाले व श्रीकांत पाटील १०१०३ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. एकूणच भाजपाच्या या विजयाचा लाभ निष्ठावंतांना कमी आणि आयारामांना अधिक झाल्याचे निकालावर नजर फिरवल्यावर लक्षात येते.(वार्ताहर)>२०० कोटींच्या संपत्तीमुळे चर्चागेल्या निवडणुकीतील झालेला पराभव आयपीआय नेते परशुराम वाडेकर यांनी यानिमित्ताने भरून काढला. ड गटात निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झालेले विद्यमान नगरसेवक प्रकाश ऊर्फ बंडू ढोरे यांनी विद्यमान नगरसेवक व विधी समिती अध्यक्ष कैलास गायकवाड यांचा पराभव करत त्यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकले. गेली पाच वर्षे दररोज सकाळी ७ वाजता नागरिकांसाठी संपर्क कार्यालयात उपस्थित राहणे व नागरिकांच्या समस्यांची तत्काळ सोडवणूक करण्याच्या त्यांच्या या पद्धतीमुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव करणे कुणालाच शक्य झाले नाही. क गटात माजी नगरसेवक आनंद छाजेड, श्रीकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले व शपथपत्रात सुमारे २०० कोटींची संपत्ती दाखविल्यामुळे चर्चेत आलेले विजय शेवाळे यांच्यातील लढत चांगलीच रंगली.
औंधमध्ये कमळाला पसंतीची मोहोर
By admin | Published: February 27, 2017 12:55 AM