शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

क्षमता, आवडीनुसार शाखा निवडा

By admin | Published: July 22, 2016 1:33 AM

जिद्द, चिकाटी, प्रयत्नात सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाखाली स्वत:ची क्षमता व आवड विचारात घेऊन दहावीनंतरच्या शिक्षणासाठी शाखा निवड करावी

पिंपरी : जिद्द, चिकाटी, प्रयत्नात सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाखाली स्वत:ची क्षमता व आवड विचारात घेऊन दहावीनंतरच्या शिक्षणासाठी शाखा निवड करावी. अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्राशिवायही करिअर करता येते. कला व वाणिज्य शाखेतून बारावीला चांगले गुण प्राप्त करून अनेक शाखांमध्ये पदवी व पदविका घेऊन उच्च पगाराच्या नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी पिंपरीत केले.पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम आणि नगरसेवक सद्गुरू कदम, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती निर्मला कदम, माजी नगरसेवक वसंत शेवडे, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण रुपनर, आनंदा फडतरे, एचए कामगार प्रतिनिधी विजय पाटील, कामगार नेत्या भारती घाग, राजू बनपट्टे, बसवराज शेट्टी आदी उपस्थित होते. वेलणकर म्हणाले, ‘‘स्वत:ची सर्जनशीलता चांगली असेल, तर कला व वाणिज्य शाखेतून बारावीला चांगले गुण मिळवून आयआयटी, पवई येथून अभियांत्रिकीची पदवी घेता येते. कलात्मकता चांगली असेल, तर फॅशन डिझायनिंगमधूनदेखील कमी भांडवलात व्यवसाय उभारता येतो किंवा अधिक कष्टाची तयारी असल्यास मोठ्या फॅशन डिझायनरच्या हाताखाली वा मोठ्या कंपनीमध्ये नोकरीच्या संधी मिळतात. इंग्रजीचा बाऊ न करता प्रयत्नपूर्वक ही भाषा अवगत केल्यास इंग्रजीसह अनेक परकीय भाषांत संधी उपलब्ध आहेत. एफडीआयमुळे राज्यात अनेक परकीय कंपन्या आगामी काळात सुरू होणार आहेत. यामध्ये परकीय भाषेचे ज्ञान असणाऱ्या मुला-मुलींना चांगल्या संधी आहेत. (प्रतिनिधी) >परदेशात संधी : स्पर्धा परीक्षांचाच विचार नकोबारावीनंतरच्या कोणत्याही शाखेतून परकीय भाषेची पदवी, पदविका मिळविता येते. यातून परदेशात नोकरी करण्याचीदेखील संधी मिळते. ज्यांचे चित्रकलेवर प्रभुत्व आहे त्यांना पुण्यातील अभिनव व मुंबईतील जे जे कॉलेज आॅफ फाइन आर्टमधून पदवी घेता येते. अभ्यासाची तयारी असेल, तर चांगल्या इन्स्टिट्यूटमधून बीसीए करूनदेखील नोकरीच्या अनेक संधी आहेत. स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त यूपीएससी, एमपीएससी असाच विचार केला जातो.